नवी दिल्ली :  भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कोच अनिल कुंबळे यांच्यातील वाद आता जगजाहीर आहे. या वादामध्ये आता माजी कर्णधार सौरभ गांगुली याने उडी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट सल्लगार समितीचा सदस्य असलेला सौरभ गांगुली याला विचारण्यात आले की कशा प्रकारच्या कोचचा शोध घेत आहे. त्यावर गांगुली म्हणाला, असा कोच जो आमच्यासाठी मॅच जिंकू शकेल. 


राज्य असोसिएशनच्या एका बैठकीसाठी बीसीसीआयच्या मुख्यालयात सौरभ गांगुली आला होता.  गांगुली म्हणाला, तीन सदस्यीय पॅनलसमोर कोच निवडण्यासाठी पहिली अट ही टाकली जाईल की त्याने कोहलीशी सामंजस्य बनवायला पाहिजे. तसेच कर्णधारालाच त्याने बॉस ठेवायला पाहिजे, असा टोलाही गांगुलीने लगावला. 


बीसीसीयाचे कार्यवाहक अध्यक्ष अमिताभ चौधरी म्हटले की, कुंबळे आणि कोहलीचा वाद बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय आहे. 


नव्या कोचच्या निवडीसाठी सीएसी बीसीसीआयकडून दिशानिर्देश घेणार आहे. त्यानुसार श्रीलंका दौऱ्यापूर्वी नव्या कोचची निवड व्हायला हवी. आता बीसीसीआय टीम मॅनेजर कपिल मल्होत्राच्या रिपोर्टची वाट पाहत आहे. पण असे असताना टीम इंडियाच्या पुढील कोचच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 


भारतीय क्रिकेट टीमच्या कोच पदासाठी अर्जाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी इच्छूक असणाऱ्यांना ९ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. ज्यांनी या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा विचार करण्यात येणार आहे.