SA20 League, Dewald Brevis: भारतात ज्याप्रकारे आयपीएलची क्रेझ असते, त्याचप्रकारे दक्षिण आफ्रिकेत  मिनी आयपीएल सामन्यांचा उत्साह पहायला मिळतो. डर्बन सुपर जायंट्स (Durban Super Giants) आणि एमआय केपटाऊन (MI Cape Town) यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर जायंट्सने दणदणीत विजय मिळवला. लिगच्या पाचव्या सामन्यात डर्बनने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व निर्माण केलं होतं. त्यानंतर सामना रंगतदार स्थितीत पोहोचला. (Kyle Mayers bowls out Dewald Brevis with a splendid Yorker watch video marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डर्बन सुपर जायंट्स विरुद्ध एमआय केपटाऊन (MI Cape Town vs Durban Super Giants) सामन्यातील एका विकेटची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. टॉस जिंकल्यानंतर डर्बनने एमआय केप टाऊनला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर केप टाऊनची सुरूवात खराब झाली आणि गोलंदाज डर्बन सुपर जायंट्सच्या भरोश्यावर खरे उतरले.


आणखी वाचा - इतंकही डोक्यावर चढवू नका...; टेस्ट टीममध्ये निवड केल्याने Suryakumar Yadav वर जहरी टीका


सलामीला उतरलेला डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. डर्बन सुपर जायंट्सच्या काईल मेयर्सच्या (K Mayers) एका परफेक्ट यॉर्करवर (Splendid Yorker) ब्रेविसच्या दांड्या उडाल्या. मेयर्सचा यॉर्कर एवढा कडक होता की,  ब्रेविसला जागेवरून हालचाल देखील करता आली नाही आणि दोन स्टंप उडून बाजूला पडाले.


पाहा Video - 



दरम्यान, एमआय केपटाऊनला 20 षटकात फक्त 152 धावा करता आल्या. त्यात Roelofsen ने 52 धावांची खेळी केली. तर George Linde याने 33 धावा करत टीमला सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देताना Kyle Mayers आणि Quinton de Kock यांनी संयमी सुरूवात करून दिली आणि अखेरीस Keemo Paul ने 3 षटकार खेचल सामना तडीपार केला.