मुंबई : मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूनं आयपीएलमध्ये धुमाकूळ घातला. त्याच खेळाडूनं आता इंग्लंडच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडला आहे. त्याच्या तुफान फलंदाजीसमोर बॉलर्सही हैराण झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फलंदाजाने 10 बॉलमध्ये 52 धावा केल्या. त्याने 10 बॉलमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानात केली. त्याच्या तुफान फलंदाजीचं कौतुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


आयपीएलमध्ये टीम डेव्हिडने आपल्या तुफान फलंदाजीने सगळयांना थक्क केलं होतं. त्याने आता टी 20 ब्लास्ट टुर्नामेंटमध्ये लंकाशायरकडून खेळताना 32 बॉलमध्ये 66 धावांची खेळी केली. 52 धावा तर फक्त चौकार आणि षटकार मिळून केल्या आहेत. त्याची तुफान फलंदाजी पाहून सगळेच हैराण झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लंकाशायर संघाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात यॉर्कशायरचा संघ 20 ओव्हरमध्ये 8  विकेट गमावून 209 धावाच करता आल्या. त्यामुळे सामना 4 धावांनी गमावला. टीम डेव्हिडला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आलं.