आयपीएल 2019 | मुंबईला झटका, मलिंगा पहिल्या 6 मॅच खेळणार नाही
लसिथ मलिंगासाठी मुंबईने या पर्वासाठी 2 कोटी मोजले आहेत.
मुंबई : आयपीएलच्या 12 व्या पर्वाला आजपासून (23 मार्च) सुरुवात होत आहे. याआधीच मुंबई टीमला एक मोठा झटका लागला आहे. आयपीएलसाठी मुंबई टीम कडून खेळणाऱ्या लसिथ मलिंगाने पहिल्या सहा मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई टीमसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
'मी क्रिकेट बोर्डाकडून आयपीएल २०१९ मध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. पंरतु ज्या खेळाडूंना आगामी वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळवायचे आहे, त्यांना Super Provinicial one day क्रिकेट स्पर्धेत खेळावं लागेल. या अटीवर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने परवानगी दिली.' असे मलिंगा म्हणाला. मलिंगा ईएसपीएन या वेबसाईटच्या मुलाखतीत बोलत होता.
'क्रिकेट बोर्डाने ठेवलेल्या अटी मी मान्य केल्या. मी आयपीएलच्या पहिल्या सहा मॅचमध्ये खेळणार नसल्याची कल्पना आयपीएल आणि मुंबई टीमच्या अधिकाऱ्यांना द्यावी , अशी विनंती क्रिकेट बोर्डाला केली असल्याचे मलिंगा म्हणाला. 'माझ्यासाठी देश पहिला आहे. त्यामुळे मी आयपीएल मधून मिळणाऱ्या रक्कमेचा विचार करत नाही. मी देशाला प्रथम प्राधान्य देतो. मी जे काही करतोय ते देशासाठी करतोय' असेही मलिंगा म्हणाला. लसिथ मलिंगासाठी मुंबईने या पर्वासाठी 2 कोटी मोजले आहेत. आयपीएलच्या गतवर्षाच्या पर्वामध्ये मलिंगाने मुंबई टीमचा बॉलिंग साहाय्यक म्हणून भूमिका बजावली होती.
आयपीएल मधील मुंबईची टीम यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत 3 वेळा विजेतेपद मिळवले आहे. यामध्ये मलिंगाचे मोठे योगदान आहे. मुंबईची या पर्वातील पहिली मॅच 24 मार्चला दिल्ली विरुद्ध होणार आहे. मुंबईच्या टीममध्ये एकूण 24 खेळाडू आहेत. यापैकी 8 खेळाडू हे परदेशी आहेत.
मलिंगा पाठोपाठ न्यूझीलंडचा फास्टर बॉलर एडम मिल्ने याने देखील आयपीएल 2019 मधून माघार घेतली आहे. एडम मिल्नेला दुखापतीमुळे बाहेर व्हावे लागत आहे. त्यामुळे मलिंगाच्या पाठोपाठ एडम मिल्नेच्या रुपात मुंबई टीमला दुसरा झटका लागला आहे. मुंबईने एडम मिल्नेला यंदाच्या 12 व्या आयपीएल पर्वासाठी 75 लाख मोजले. मिल्नेच्या जागेवर विंडीजच्या अल्झारी जोसेफला संधी देण्यात आली आहे.
मुंबईचे संभावित 11 खेळाडू : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, एविन लुइस, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, बेन कटिंग, हार्दिक पांड्या, जेसन बेहरनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, मयंक मार्कंडे.
मुंबई इंडियंस संपूर्ण टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, इविन लुइस, अनमोलप्रीत सिंह, सूर्यकुमार यादव, सिद्देश लाड, ईशान किशन, आदित्य तरे, हार्दिक पांड्या, कीरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, बेन कटिंग, युवराज सिंह, पंकज जयस्वाल, मयंक मार्कंडे, राहुल चाहर, अनुकूल रॉय, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, एडम मिल्ने, मिशेल मैक्लेंघन, जेसन बेहरेनडोर्फ, रासिख सलाम, लसिथ मलिंगा, बारिंदर सरण.