Lee Germon record 8 Sixes in an over: विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये ऋतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad) उत्तर प्रदेशविरूद्ध एका ओवरमध्ये 7 सिक्स मारून मोठा पराक्रम रचला. ऋतुराजने या सामन्यात उत्तर प्रदेश विरूद्ध 49 व्या ओव्हरमध्ये हा विक्रम केला. या ओव्हरमध्ये एकूण 43 रन्स झाले. मात्र तुम्हाला माहितीये का एका फलंदाजाने गायकवाडपेक्षाही मोठा पराक्रम केलाय. या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 7 नव्हे तर 8 सिक्स लगावल्याची नोंद आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गोष्ट 1989–90 मधली आहे. एका प्रथम श्रेणीच्या सामन्यात दरम्यान न्यूझीलंडचा विकेचकीपर ली जर्मन (Lee Germon) यांनी  वेलिंग्टनविरूद्धच्या सामन्यात गोलंदाज बर्ट वेंसला एकाच ओव्हरमध्ये 8 सिक्स लगावले होते. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, या गोलंदाजाने या ओव्हरमध्ये एकूण 22 बॉल्स फेकले होते, ज्यामधील 17 बॉल्सची नो बॉल म्हणून नोंद आहे.


या ओव्हरमध्ये ली जर्मन यांनी एकट्यानेच 70 रन्स ठोकले होते. या ओव्हरमध्ये इतके बॉल्स फेकले गेले की, अंपायर बॉल्सची गणना करणंही विसरून गेले. अखेरीस 5 योग्य बॉल्स फेकल्यानंतर ओव्हर संपण्याचा करार देण्यात आला. दरम्यान गोलंदाजाच्या एका ओव्हरमध्ये तब्बल 77 रन्स निघाले होते. 


वेलिंग्टन शेल ट्रॉफीमध्ये कँटरबरी आणि वेलिंग्टन (Wellington vs Canterbury) यांच्यामध्ये ही मॅच खेळवली गेली होती. कँटरबरीच्या दुसऱ्या डावात ली जर्मनने 143 बॉल्समध्ये 160 रन्स केले होते. ज्यामध्ये 16 फोर आणि 8 सिक्सचा समावेश होता. हा सामना अखेरीस ड्रॉ झाला होता. 


अशी झाली होती ओव्हर


0,4, 4, 4, 6, 6, 4, 6, 1, 4, 1, 0, 6,6, 6, 6, 6, 0, 0, 4, 0, 1, – एकूण 77 रन्स



ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफित ठोकलं द्विशतक 


विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या (Vijay Hazare Trophy 2022)  दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडच वादळ पाहायला मिळालं. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विरुद्धच्या रंगलेल्या सामन्यात गायकवाडने (Ruturaj Gaikwad) द्विशतक ठोकले आहेत. गायकवाडने 159 बॉलमध्ये 220 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 16 सिक्सर मारले आहेत. त्याच्या या खेळीने त्याने सिलेक्टर्सचे लक्ष पुन्हा वेधले आहे. 


 एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्सर


ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad World Record) एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले आहेत. महाराष्ट्राच्या डावाच्या 49व्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) ही किमया करून दाखवली आहे. ऋतुराजने बॉलर शिवा सिंहविरुद्ध ओव्हरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 4 सिक्स ठोकले. त्यानंतर पाचवा बॉल नो बॉल ठरला होता, त्या बॉलवर देखील त्याने सिक्स मारला होता. त्यानंतर पुढील दोन बॉलवर देखील त्याने सिक्स ठोकले आहेत.