LLC 2023 : टीम इंडियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सध्या कतारमध्ये लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा (Legends League Cricket 2023) खेळतायत. या स्पर्धेत अनेक दिग्गज क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. इंडिया महाराजा (Indian Maharaja), एशिया लायन्स (Asia Lions) आणि वर्ल्ड जायंट्स (World Giants) या तीन संघांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली इंडियन महाराजाने या स्पर्धेत भाग घेतला होता. यात भारताचा माजी अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचाही (Harbhajan Singh) समावेश होता. या स्पर्धेत हरभजन सिंगने दमदार कामगिरी केली. पण मैदानाबाहेरच्या एका व्हिडिओने हरभजन सिंग चर्चेत आला आहे. हरभजनचा हाणामाराची एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Viral Video on Social Media) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
हरभजन सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत हरभजन सिंग कतारमधल्या वाळवंटात दिसत असून तो एका व्यक्तीबरोबर कुस्ती लढताना दिसत आहे. हरभजन सिंग ज्या व्यक्तीबरोबर कुस्ती लढतोय, तो दुसरा-तिसरा कोणी नाही, तर तो हरभजनचा लहानपणीचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू रितेंदर सिंग सोढी आहे. या कुस्तीत हरभजन सिंगने सोढीला चितपट केलं.


हरभजन सिंगची धमालमस्ती
या व्हिडिओत हरभजन सिंग चांगलाच मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. हरभजन सिंग रितेंदर सिंग सोढीबरोबर कुस्ती लढल्यानंतर आता एका व्यक्तीबरोबर कुस्ती करताना दिसत आहे. मैदानाबाहेर धमालमस्ती करणारा हरभजन सिंग मैदानातही दमदार कामगिरी करतोय. लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत हरभजन सिगेने 3 सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. 



इंडियन महाराजाचा पराभव
दरम्यान, इंडियन महाजाचं लीजेंड्स लीगच्या फायनलमध्ये जाण्याचं स्वप्न भंगलं आहे. एलिमिनेटर राऊंडमध्ये एशियन लायन्सने इंडियन महाराजाचा तब्बल 85 धावांनी पराभव केला. पहिली बॅटिंग करणाऱ्या एशियन लायन्सने निर्धारीत 20 षटकांमध्ये 191 धावा केल्या. उपूल थरंगाने सर्वाधिक 50 धावा केल्या. याला उत्तर देताना इंडियन महाराजाचा संघ अवघ्या 106 धावांमध्ये गडगडला. गौतम गंभीर वगळता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. गंभीरने 32 धावा केल्या. 


आता एशियन लायन्स आणि वर्ल्ड जाएंट्स दरम्यान लीजेंड्स लीग स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत गौतम गंभीर पहिल्या क्रमांकावर आहेत. गंभीरने 4 सामन्यात 215 धावा केल्यात, यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर सर्वाधिक विके