Legends League : लीजेंड्स लीगचा (Legends League) पहिला क्वालिफायर सामना इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्ज यांच्यात जोधपूरमध्ये खेळवला गेला. गौतम गंभीरच्या (gautam gambhir) नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने ( India Capitals) हा सामना 4 गडी राखून जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. पण सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भिलवाडा किंग्जचा (Bhilwara Kings) युसूफ पठाण (Yusuf Pathan) इंडिया कॅपिटल्सचा ( India Capitals) वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनशी (Mitchell Johnson) सामना करताना दिसत आहे. काही वेळाने या शाब्दिक युद्धाचे रुपांतर हाणामारीत झाले. (Legends League scuffle broke out between Mitchell Johnson and Yusuf Pathan) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल (viral video) होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सनमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळते. मात्र काही सेकंदांनंतर दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यानंतर जॉन्सन पठाणला (Yusuf Pathan) धक्काबुक्की करतो. या प्रकरणात, जॉन्सन (Mitchell Johnson) हसत निघून जातो. यादरम्यान संघातील इतर खेळाडूंसह अंपायनाही मदतीला यावे लागते.


इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्ज यांच्यातील सामन्यात ही घटना घडली. युसूफ पठाण त्याचा भाऊ इरफान पठाणच्या नेतृत्वाखालील संघाचा भाग होता. त्याने 24 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याचा आणि जॉन्सनचा वाद झाला. वादविवाद सुरू असताना युसूफ पठाण काही बोलत असताना जॉन्सनच्या जवळ आला. त्यावर जॉन्सनने त्याला धक्काबुक्की केली. यामुळे युसूफ आणखी संतापला. मात्र, येथे पंच आणि खेळाडूंनी हस्तक्षेप केला. 



रॉस टेलर (84) आणि कॅरेबियन दिग्गज अॅश्ले नर्स (नाबाद 60) यांच्या झंझावाती खेळीच्या बळावर इंडिया कॅपिटल्सने रविवारी जोधपूरच्या बरकतुल्ला खान स्टेडियमवर लिजेंड्स लीग क्रिकेट क्वालिफायरच्या रोमहर्षक सामन्यात बाजी मारली. भिलवाडा किंग्जचा 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना भिलवाडा किंग्जने 5 बाद 226 धावा केल्या. इंडिया कॅपिटल्सने हे आव्हान तीन चेंडू बाकी असताना 6 गडी गमावून पूर्ण केले. श्रीसंतच्या चेंडूवर षटकार मारून नर्सने इंडिया कॅपिटल्सला अंतिम फेरीत नेले.