Usman Khawaja VIDEO: पाकिस्तानची टीम सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून आज पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. मात्र या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया टीमचा अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. मूळचा पाकिस्तानच्या असलेला ख्वाजाने त्याच्या बूटांवर एक खास मेसेज लिहिला होता. हेच बूट घालून तो मैदानात उतरणार असल्याचंही ख्वाजाने सांगितलं होतं. मात्र आयसीसीने त्याला परवानगी दिली नाही. यानंतर आता ख्वाजाने त्याच्या अकाऊंटवरून इमोशनल मेसेज पोस्ट केला आहे. 


इस्राईल-हमासशी संबंधीत मेसेज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिरीजमधील पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात इस्रायल-हमास युद्धाशी संबंधित कोणताही संदेश दिला जाणार नाही, यासाठी आयसीसीने यापूर्वीच इशारा दिला आहे. 


हा कसोटी सामना पर्थमध्ये खेळवला जातोय. पाकिस्तानी वंशाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाने यावेळी शूज घालून त्यावर खास मेसेज लिहिणार असल्याचे संकेत दिलेत. मात्र यावेळी आयसीसीने त्याला तसं करण्यापासून रोखल्यानंतर ख्वाजाने सोशल मीडियावर दोन मिनिटं 20 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.


ख्वाजाने शेअर केला व्हिडीओ


इस्लामाबादमध्ये जन्मलेले ख्वाजा आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की, 'मला मानवतेसाठी आवाज उठवायचा आहे. दुसर्‍या दृष्टीकोनातून बघितलं तर ही गोष्ट वेगळीये. मी हे सर्वांसाठी सांगतोय. प्रत्येक जीवन माझ्यासाठी समान आहे. प्रत्येक ज्यूचं आयुष्य प्रत्येक मुस्लिमाच्या जीवनाप्रमाणे आहे आणि प्रत्येक हिंदूच्या जीवनाप्रमाणे आहे. सर्वांचं जीवन समान आहे. ज्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांचा आवाज मी उठवण्याचा प्रयत्न करतोय. 



मानवतेसंदर्भासाठी खास मेसेज


ऑस्ट्रेलियन टीमचा क्रिकेटर उस्मान ख्वाजा याविषयी म्हणाला की, आयसीसीची मार्गदर्शक तत्त्वे आहेत, सामन्यादरम्यान राजकीय संदेश दिला जाऊ शकत नाही. परंतु मी त्याच्याशी सहमत नाही. हा संदेश कोणत्याही प्रकारे राजकीय नसून तो मानवतेसाठी आहे.


मंगळवारी ऑस्ट्रेलियन टीमच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये उस्मान ख्वाजाने शूज घातले होते. या शूजवर लिहिलं होतं की, 'सर्वांचं जीवन समान आहे'. तर दुसऱ्यावर लिहिलं होतं की, स्वातंत्र्य हा माणसाचा हक्क आहे. प्रॅक्टिस सामन्यापूर्वी ख्वाजाने आपल्या सहकाऱ्यांनाही या मेसेजबद्दल सांगितलं नव्हतं. हे शूज घालून तो खाली आला तेव्हा सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. 


मुख्य म्हणजे यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने स्पष्ट केलं होतं की, उस्मान ख्वाजा हे बूट घालणार नाही आणि तो आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करेल.