हॅमिल्टन : महेंद्रसिंह धोनी.... 'बस्स नाम ही काफी है' असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. स्टंपमागे उभं राहून यष्टीरक्षण करण्यापासून ते खेळपट्टीवर चौफेर फटेबादजी करण्यापर्यंत धोनीला जमत नाही अशी एकही गोष्ट नाही. आपल्या खेळाने क्रीडारसिकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या आणि विरोधी संघातील खेळाडूंना पेचात पाडणाऱ्या याच धोनीच्या अफलातून खेळाचं प्रदर्शन पुन्हा एकदा पाहायला मिळालं. हॅमिल्टनमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात धोनीचा हा अंदाज पाहायला मिळाला. 


तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला असला तरीही धोनीच्या या चपळ खेळाने मात्र बीसीसीआयलाही पेचात पाडलं आहे. तिसऱ्या आणि निर्णायक टी२० सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दणक्यात सुरुवात करत संघाची धावसंख्या वेगाने पुढे नेण्यास सुरुवात केली. ८० धावांपर्यंत विरोधी संघाचा एकही गडी बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं नव्हतं. तेव्हाच तारणहार धोनी खऱ्या अर्थाने हाकेला धावला.   

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



आठव्या षटकाच्याच वेळी कुलदीप यादवच्या चेंडूवर टीम सायफर्टने खेळण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका चुकला, चेंडू धोनीच्या हातात पोहोचला आणि सायफर्ट पुन्हा सीमारेषेच्या आत पाय ठेवणार तोड धोनीने अवघ्या काही सेकंदांमध्ये स्टंपिग करत त्याला तंबूत परत पाठवलं. धोनीच्या या स्टंपिंगमुळे त्याने यष्टीरक्षणाच्या आपल्या कारकिर्दीत शॉर्टेस्ट फॉर्म क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग घेण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत अग्रस्थान मिळवलं आहे. ३४ स्टंपिंगसह धोनी अग्रस्थानी असून, त्यामागोमाग कामरान अकमल (पाकिस्तान), मोहम्मद शाहजाद (अफगाणिस्तान)/ मुशफिकर रहिम (बांग्लादेश), दिनेश रामदिन (वेस्टइंडिज)/ कुमार संघकारा (श्रीलंका) या खेळाडूंची नावं येतात.