बर्मिंघम :  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर प्रचंड दबाब टाकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या हसन अलीने ३, इमाद वसीमने दोन आणि मोहम्मद हाफीजने एक विकेट घेतली. पाकिस्तानच्या जबरदस्त गोलंदाजीने आफ्रिकेचे कंबरडे मोडले. 


नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार डिव्हिलिअर्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला नाही. पहिल्यापासून आफ्रिकेचे फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजाच्या दबावाखाली दिसत होते. जलद गती गोलंदाजीचा सामना केला. पण स्पीनर आल्यावर आफ्रिकेचे फलंदाज एकामागे एक बाद झाले.  


सर्वात प्रथम झटका हाशिम आमला याच्या रुपाने आफ्रिकेला लागला. तेव्हा आफ्रिकेचा स्कोअर ४० असा होता. आमलाने १६ धावा केल्या. त्याला इमाद वसीम याने पायचीत बाद केले.  त्यानंतर डिकॉक ३३ धावांवर असताना त्याला मोहम्मद हाफीज याने पायचीत बाद केले. तेव्हा आफ्रिकेचा स्कोअर ६० धावा होत्या. 


डिकॉक बाद झाल्यावर मैदानात आलेला डिव्हिलिअर्स पहिल्याच चेंडूवर इमाद वसीमच्या चेंडूवर बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर सावध खेळी करणाऱ्या ड्युप्लसीस याला हसन अली याने त्रिफळाचीत केले. त्याने केवळ २६ धावा केल्या. 


जे पी ड्युमिनीला हसन अलीने ८ धावांवर बाद केले. त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर वेन पार्नेल याला हसनने शून्यावर बाद केले.