IND Vs AUS LIVE Updates: विजयाच्या उंभरठ्यावर नेऊन विराट कोहली बाद! 85 धावांची झुंजार खेळी
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : आयसीसी पुरुष विश्वचषक 2023 मध्ये आज भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हा सामना एमए चिदंबरमच्या मैदानावर म्हणजेच चेपॉक, चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.
India vs Australia Live : भारतीय क्रिकेट संघ आज (8 ऑक्टोबर) विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पाचवेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियासोबत भारताचा सामना होईल. 13व्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचाही हा पहिलाच सामना असणार आहे. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स वनडे क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेत प्रथमच कर्णधारपद भूषवणार आहेत. विजयाने सुरुवात करण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष असणार आहे.
Latest Updates
टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीने पुन्हा एकदा आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. विराटने टीम इंडियाला पराभवाच्या तोंडातून बाहेर काढलं. विराटने 85 धावांची झुंजार खेळी केली.
विराट कोहली पाठोपाठ केएल राहुल याने देखील अर्धशतक झळकावलं आहे. 71 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संयमी खेळी करत अर्धशतक झळकावलं आहे. विराट कोहलीने 77 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या अन् टीम इंडियाला विजयाच्या वाटेवर पुन्हा आणून ठेवलंय.
टीम इंडियाची सुरूवात अतिशय खराब झाली असून पहिले तीन फलंदाज शुन्यावर बाद झाले आहेत. रोहित अन् इशाननंतर आता श्रेयय अय्यर देखील शुन्यावर बाद झालाय.
इशान किशन पाठोपाठ रोहित शर्मा देखील शुन्यावर बाद झालाय. त्यामुळे आता टीम इंडियाची परिस्थिती 2-2 अशी झालीयेय
शुभमन गिलच्या जागी टीम इंडियामध्ये संधी मिळालेल्या इशान किशनला पहिल्या सामन्यात भोपळा देखील फोडता आला नाही. तो पहिल्याच बॉलचा सामना करताना बाद झाला.
जडेजा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज; बुमराह, यादवही चमकले
भारताकडून सर्वाधिक विकेट्स रविंद्र जडेजाने घेतल्या. 10 ओव्हरपैकी 2 ओव्हर निर्धाव टाकत 28 धावांच्या मोबदल्यात जडेजाने 3 गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने आणि कुलदीप यादवने प्रत्येक 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्वीनने प्रत्येक एक विकेट घेतली.
भारताला विजयासाठी हव्यात 200 धावा; ऑस्ट्रेलियन संघ All Out
मिचेल स्टार्क मोठा फटका मारण्याच्या नादात 50 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर स्टार्क 35 चेंडूंमध्ये 28 धावा करुन श्रेयस अय्यरकरवी झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियन संघ डावातील 3 चेंडू शिल्लक असतानाच 199 धावांवर तंबूत परतला.
ऑस्ट्रेलियाचा 9 वा गडी बाद! विराट कोहलीने पकडला झेल
ऑस्ट्रेलियन गोलंदाज अॅडम झाम्पा झेलबाद झाला आहे. संघाची धावसंख्या 189 वर असताना मोठा फटका मारण्याच्या नादात झाम्पा बाद झाला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर झाम्पा विराटकरवी झेलबाद झाला. झाम्पाने 20 चेंडूत 6 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स झेलबाद! ऑस्ट्रेलियाचे 8 खेळाडू तंबूत
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स मोठा फटका मारण्याच्या नादात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद झाला. संघाची धावसंख्या 165 इतकी असताना कमिन्सच्या रुपाने 8 गडी बाद झाला.
मॅक्सवेल नंतर, ग्रीन देखील बाद! ऑस्ट्रेलियाचे 7 गडी माघारी
ऑस्ट्रेलियाची 7वी विकेट पडली. रविचंद्रन अश्विनने कॅमेरून ग्रीनला बाद केलं. ग्रीन 8 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलिया पूर्णपणे बॅकफूटवर आहे. त्याने 7 गडी गमावून 140 धावा केल्या आहेत.
कुलदीप यादवने मॅक्सेवेलला केलं बोल्ड! ऑस्ट्रेलियाचे 6 गडी माघारी
कुलदीप यादवने मॅक्सेवेलला बोल्ड केलं आहे. 36 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर मॅक्सेवल बोल्ड झाला. तो 25 बॉलमध्ये 15 धावा करुन तंबूत परतला. कुलदीपची ही दुसरी विकेट ठरली. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 140 वर असताना मॅक्सेवल तंबूत परतला.
एकाच ओव्हरमध्ये जडेजाने घेतल्या 2 विकेट! ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत
रविंद्र जडेजाने सामन्यातील 30 व्या ओव्हरला अॅलेक्स कॅरीला भोपळाही न फोडता तंबूत पाठवलं. अॅलेक्स कॅरी पायचित झाला. केवळ 2 चेंडू खेळून तो तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 30 ओव्हरनंतर 119 ला 5 गडी बाद असा आहे.
जडेजाची गाडी सुसाट! स्मिथ पाठोपाठ सेट झालेल्या लाबुशेनचीही विकेट काढली
रविंद्र जडेजाच्या फिरकी गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथपाठोपाठ सेट झालेला मार्नस लाबुशेनही तंबुत परतला आहे. लाबुशेन 41 चेंडूंमध्ये 27 धावा करुन विकेटकीपर के. एल. राहुलकरवी झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 119 वर 4 गडी बाद अशी आहे.
जडेजाने स्मिथला फिरकीत गुंडाळला; अर्धशतकाआधीच स्मिथ क्लिन बोल्ड
रविंद्र जडेजाच्या भन्नाट फिरत्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ बोल्ड झाला आहे. सामन्यातील 28 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर फिरता चेंडू खेळून काढण्याच्या नादात स्मिथ बोल्ड झाला. जडेजाच्या चेंडूने स्मिथचा ऑफ स्टम्प उडवला. स्मिथ ऑस्ट्रेलियाचा स्कोअरकार्ड 110 वर असताना बाद झाला. हा ऑस्ट्रेलियासाठी तिसरा झटका ठरला. स्मिथ 46 धावा करुन बाद झाला. यासाठी त्याने 71 चेंडू घेतले. मात्र सेट झाल्यानंतर स्मिथ बाद झाला.
ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 100 पार! 25 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने गाठला 100 चा आकडा
कुलदीपच्या फिरकीत अडकला डेव्हीड वॉर्नर; Caught And Bowled!
कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियन सलामीवर डेव्हीड वॉर्नरला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. वॉर्नरने 41 धावा केल्या. 17 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर वॉर्नर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 74 धावांवर 2 गडी बाद असा आहे.
13 ओव्हरनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 59 वर पोहोचला आहे. क्रिजवर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ सेट झाले आहेत. 13 ओव्हरला वॉर्नरने 34 चेंडूंमध्ये 29 धावांवर खेळत आहे. तर स्टीव्ह स्मिथने 30 चेंडूंमध्ये 38 धावा केल्या आहेत.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला, कोहलीने घेतला आश्चर्यकारक झेल
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. मिचेल मार्श खाते न उघडताच बाद झाला. मार्शला जसप्रीत बुमराहने माघारी पाठवलं आहे. डावीकडे डायव्हिंग करून स्लिप पोझिशनमध्ये मार्शला विराट कोहलीने झेलबाद केले.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : भारताने नाणेफेक गमावल्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय
विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजारपणामुळे शुभमन गिल आज सामना खेळत नाहीये. त्याच्या जागी इशान किशन रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करेल.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : ही आहे भारताची प्लेइंग-11
इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : शुभमन गिल आजारपणामुळे सामना खेळणार नाही
टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा धक्का बसला आहे. शुभमन गिल आजारपणामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार गिल संघासह स्टेडियममध्ये पोहोचला नाही. त्याच्या जागी फक्त इशान किशन डावाची सुरुवात करताना दिसत आहे.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : दीड वाजता होणार टॉस
विश्वचषक 2023 च्या पाचव्या सामन्यातील नाणेफेक दुपारी 1.30 वाजता होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथे हा सामना होणार आहे.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पाऊस ठरणार अडचण?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हवामान अहवालानुसार, गेल्या आठवड्यापासून चेन्नईमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. सामन्याच्या दिवशीही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. Accuweather च्या अहवालानुसार, रविवारी चेन्नईमध्ये पावसाची शक्यता 20 टक्के आहे. त्यामुळे हवामान जवळपास स्वच्छ असेल. मात्र काही वेळा ढग असू शकतात. तापमान 25 ते 33 अंशांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. संध्याकाळ जवळ येईल तसतसे हवामान थंड होईल आणि दव पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक खूप महत्त्वाची ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता फारच कमी असल्याचे स्पष्ट आहे.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : ख्रिस गेलच्या विक्रमाकडे रोहित शर्माचे लक्ष्य
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (551) याला ख्रिस गेल (553)ला मागे टाकण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनण्यासाठी तीन षटकारांची गरज आहे. रविवारी चेन्नई येथे होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रोहित ही कामगिरी करू शकतो.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : स्टीव्ह स्मिथ ठरू शकतो धोकादायक
ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ प्रत्येक फॉरमॅटमध्ये भारताला भारी पडताना दिसतो. ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार असलेल्या स्टीव्ह स्मिथने वनडे सामन्यांमध्ये अनेकदा भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं आहे. आकडेवारीनुसार त्याने आतापर्यंत 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1260 धावा केल्या आहेत. त्याची सरासरीही 54.78 इतकी आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजाबाबतही भारताला सावध राहावे लागणार आहे.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : पॅट कमिन्स बनू शकतो गेम चेंजर
ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सकची भारताविरुद्ध चांगली कामगिरी आहे. गोलंदाजीसोबतच तो फलंदाजीतही त्याची कमालीची आकडेवारी आहे. पॅट कमिन्सने भारताविरुद्ध आतापर्यंत 19 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कमिन्स 6 किंवा 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो आणि त्याच्याकडे फक्त काही चेंडूंवर सामना फिरवण्याची ताकद आहे.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोफत कुठे पाहू शकता?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर चाहत्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेता येईल. डीडी फ्री डिश वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य सामना पाहू शकतील.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : किती वाजता सुरु होणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी दीड वाजता टॉस होईल.
IND vs AUS, LIVE World Cup 2023 : विश्वचषकासाठी दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
IND Vs AUS World Cup 2023 LIVE Updates : विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघामधील 13 वा सामना
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात भारताने आतापर्यंत केवळ चार सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर आठ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. चार विजयांबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने 1983, 1987, 2011 आणि 2019 मध्ये पाच वेळा चॅम्पियन संघाचा पराभव केला आहे. 2003 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आणि 2015 च्या विश्वचषकाचा उपांत्य सामना देखील या दोघांमध्ये खेळला गेला होता. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
IND Vs AUS World Cup 2023 LIVE Updates : इतिहास काय सांगतो?
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 वेळा भारताचा पराभव केला आहे. तर भारताने केवळ चार वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताच्या नजराही आज हा विक्रम सुधारण्यावर असतील. दुसरीकडे भारताने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. रविवारी चेन्नई येथे होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 सामन्यात भारत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून ही लढत आणखी रंगतदार करण्याची शक्यता आहे.