IPL 2023 PBK vs KKR LIVE : लिव्ह सामन्यात पावसाचा खेळ, सामना थांबवला

Sat, 01 Apr 2023-7:24 pm,

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : पंजाब (Punjab Kings) आणि कोलकाता (Kolkata Knight Riders) यांच्यात आज सामना रंगणार आहे. मात्र हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : संपूर्ण क्रिडा विश्वाचं लक्ष लागलेल्या इंडियन प्रिमियर लीग (IPL 2023) स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. 16 व्या सिझनच्या पहिल्या विजयाचा मान पंड्याचा गुजरातला मिळाला आहे. गुजरातने चेन्नईवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. तर आज क्रीडा प्रेमींसाठी धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे. 

Latest Updates

  • पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात पावसाचा खेळ, सामना काही काळ थांबवला  

  • कोलकत्याला  सातवा धक्का, इम्पॅक्ट प्लेयर वेंकटेश अय्यर आऊट 

  • आंद्रे रसेल १८ बॉल्स मध्ये ३५ रन्स करून, सॅम करनच्या गोलंदाजीवर आऊट 

  • कोलकाता नाईट रायडर्सला पाचवा झटका, अर्धा संघ पवेलियनमध्ये

  • कोलकाता नाईट रायडर्सला चौथा झटका 

  • कोलकाता नाईट रायडर्सचे पावरप्ले मध्ये ४६ रन्स आणि ३ विकेट 

  •  इंपैक्ट प्लेयर वेंकटेश अय्यर ची धुवाधार सुरवात 

  • पंजाबचे मुख्य ३ फलंदाज ५ ओव्हरच्या आधी ड्रेसिंग रूम मध्ये परतले 

  • पंजाबला लागोपाठ दुसरा झटका 

  • पुरेशी लाईट नसल्यामुळे पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना थांबवण्यात आला

  • कोलकाता नाईट रायडर्सला जिंकण्यासाठी प्रति ओव्हर ९.५५  रन्सची आवश्यकता

  •  टिम साउथी याची शेवटची ओव्हर कोलकाता नाईट रायडर्सला पडली महागात, शेवटच्या ओव्हरला लुटवले १५ रन्स 

  • पंजाब किंग्सची बॅटींग पूर्ण... २० ओव्हर्स मध्ये केले १९१ रन्स, कोलकाता नाईट रायडर्सला १९२ धावांचं टार्गेट 

  • पंजाबला पाचवा धक्का, एस. रझा आऊट 

  • ४ विकेट्स गमावत १५.३ ओव्हर्स मध्ये पंजाब किंग्सचे १५० रन्स पूर्ण  

  • बी. राजपक्षा याचं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर उमेश यादवच्या गोलंदाजी वर आऊट  

  • बी. राजपक्षा याचं दमदार अर्धशतक...  फक्त ३० बॉल्स मध्ये पूर्ण केलं अर्धशतक

  • पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स...  पंजाबचे १० ओव्हर्समध्ये १०० रन्स पूर्ण  

  • PBKS ची दणक्यात सुरूवात; पहिल्या 6 ओव्हरमध्ये 56 धावा

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    PBKS 62/1 (6.2) 

    शिखर धवन आणि भानुका राजपक्षेकडून आक्रमण सुरू!

  • पंजाबला पहिला धक्का, नव्या दमाचा Prabhsimran Singh बाद!

    PBKS 36/1 (4.1) 

  • KKR vs PBKG: कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.(Kolkata Knight Riders have won the toss and have opted to field)

  • IPL 2023 PBKs vs KKR LIVE : पंजाब किंग्ज : संभाव्य प्लेईंग 11 
    शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ऋषी धवन, सॅम कुरान, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर.

  • IPL 2023 PBKs vs KKR LIVE : कोलकाता नाईट रायडर्स : संभाव्य प्लेईंग 11 

    रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

  • IPL 2023 PBKs vs KKR LIVE : आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये कोलकाता संघाने पंजाबवर वर्चस्व राखलं आहे. पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने 20 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सला फक्त 10 सामने जिंकले आहेत. 

  •  IPL 2023 PBKs vs KKR LIVE :  या सामन्यावर पावसाचं संकट आहे. पावसामुळे पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान होणारा सामना रद्द होऊ शकतो. हवामान विभागानेच पावसाचा इशारा दिला आहे. 

  • IPL 2023 PBKs vs KKR LIVE : मोहालीतील आयएस ब्रिंदा स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. पंजाब किंग्स शिखर धवनच्या तर कोलकाला नाईट रायडर्स नितीश राणाच्या नेतृत्वात लढतीसाठी उतरणार आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link