KKR vs DC highlights, IPL 2024 : इडन गार्डनवर कोलकाताची `बादशाहत`, दिल्लीचा 7 विकेट्सने पराभव

Mon, 29 Apr 2024-11:02 pm,

KKR vs DC Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात आज कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे.

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये कोलकाता आणि दिल्ली हे दोघं संघ दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. पहिल्यांदा जेव्हा हे दोघं संघ भिडले होते, तेव्हा केकेआरने, दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल 106 धावांनी धुव्वा उडवला होता. तर आता बघण्यायोग्य असणार की, आज ऋषभ पंतची दिल्ली आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का?

Latest Updates

  • 15 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर आहे 142-3. वेंकटेस अय्यर हा 19 धावांवर खेळत असून, श्रेयस अय्यर हा 27 धावांवर खेळतोय आणि केकेआरला जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे.

  • दिल्लीचा युवा गोलंदाज लिझाड विलियम्सन याने 10 व्या ओव्हरमध्ये रिंकू सिंगला 11 धावांवर आउट केलं आहे. तिसऱ्या विकेटनंतर मैदानात वेंकटेश अय्यर हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • अक्षर पटेल याने 7 व्या ओव्हरमध्ये केकेआरचा इन फॉर्म फलंदाज सुनील नरेन याला 15 धावांवर बाद केलं आहे. पहिल्या विकेटनंतर फलंदाजीसाठी मैदानात रिंकू सिंग आला आहे.

  • 6 व्या ओव्हरमध्ये केकेआरचा धाकड ओपनर फिल सॉल्ट याने फक्त 26 बॉलमध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आपलं ताबडतोब अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर केकेआरचा स्कोर आहे 61-0. फिल सॉल्ट हा 42 धावांवर खेळतोय, तर सुनील नरेन हा 15 धावांवर खेळत आहे. 5 ओव्हरनंतर कोलकाताला जिंकण्यासाठी 90 बॉलमध्ये 93 धावा लागत आहेत.

  • 20 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केलं आहे. दिल्लीकडून फक्त ऋषभ पंत आणि कुलदिप यादव या दोघांनी 20 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पंतने 27, तर कुलदीपने नाबाद 31  धावा केल्या आहेत. याउलट केकेआरच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केलयं चक्रवर्तीच्या खात्यात 3, हर्षित आणि वैभवच्या खात्यात प्रत्येकी 2-2, तर स्टार्क, आणि नरेन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतलेल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने, केकेआरला 154 धावांचे आव्हान दिलं आहे.

    आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, केकेआरचे फलंदाज हे टार्गेट सोप्या पद्धतीने चेस करणार की, दिल्लीचे गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या कौश्ल्याने हा सामना आपल्या खिशात टाकणार?  

  • 15 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोर 112-8 असा आहे. वरूण चक्रवर्तीने 15 व्या ओव्हरमध्ये कुशाग्र याला फक्त 1 धावावर आउट केलं आहे..

  • सुनील नरेनने 14 व्या ओव्हरमध्ये दिल्लीचा ऑलराउंडर अक्षर पटेल हा 15 धावांवर आउट केलं आहे. कुलदीप यादव हा सातव्या विकेटनंतर फलंदाजीसाठी आला आहे.

  • 13 व्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक झटका लागला आहे. वरूण चक्रवर्तीने 13 व्या ओव्हरमध्ये ट्रिस्टन स्टब्सला तंबूत परत पाठवलं आहे. सहाव्या विकेटनंतर कुमार कुशाग्र हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • वरूण चक्रवर्तीच्या 11 व्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत हा 27 धावांवर बाद झाला आहे. या विकेटनंतर दिल्लीच्या समस्या वाढल्या आहेत, तर पाचव्या विकेटनंतर ट्रिस्टन स्टब्स हा फलंदाजीसाठी आलाय. 

  • 10 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोर आहे 93-4. अक्षर पटेल आणि ऋषभ पंत हे दोघं फलंदाजी करत आहेत. अक्षर हा 12 धावांवर खेळतोय, तर पंत हा 27 धावांवर नाबाद आहे.

  •  7 व्या ओव्हरमध्ये हर्षित राणाने दिल्लीचा युवा फलंदाज अभिषेक पोरेल याला 18 धावांवर आउट केलं आहे. चौथ्या विकेटनंतर मैदानात फलंदाजीसाठी अक्षर पटेल आलाय.

  • 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोर 58-3 असा आहे. पोरेल हा 17 धावांवर तर, पंत हा 5 धावांवर खेळत आहे. कोलकाताच्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्लीचे फलंदाज बॅकफूटवर गेले आहेत.

  • चौथ्या ओव्हरमध्ये वैबव अरोराने परत एक विकेट घेतली आहे. दिल्लीचा ताबडतोब फलंदाज शे होप हा फक्त 6 धावा करून आउट झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर फलंजादीसाठी ऋषभ पंत आला आहे.

  • तिसऱ्या ओव्हरमध्ये दिल्लीचा इन फॉर्म फलंदाज फ्रेजर मॅक्गर्क हा 12 धावा करून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर शे होप हा फलंदाजीसाठी आलाय.

  • वैभव अरोराच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये दिल्लीचा घातक फलंदाज पृथ्वी शॉ हा केवळ 13 धावा करून आउट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर अभिषक पोरेल हा फलंदाजीसाठी आलाय.

  • KKR vs DC toss update - दिल्ली कॅपिटल्सचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    KKR प्लेइंग 11 - 

    फिलिप सॉल्ट (W), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (C), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

    DC प्लेइंग 11 -

    पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (W/C), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद

  • KKR vs DC संभाव्य प्लेइंग 11 -

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    KKR संभाव्य 11 -

    श्रेयस अय्यर (C), फिल सॉल्ट (W), सुनील नरेन, नीतिश राणा (उपकप्तान), वेंकटेश अय्यर, मिशेल स्टार्क, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अंगकृष रघुवंशी, सुयश शर्मा

    DC संभाव्य 11 -

    ऋषभ पंत (C/W), पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, मिशेल मार्श, अक्षर पटेल, कुमार कुशाग्र,ललित यादव, ईशांत शर्मा, जेक फ्रेजर-मैकगर्क, कुलदीप यादव और खलील अहमद.

  • आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि कोलकाता एकूण 33 आमने-सामने आले आहेत. त्यातून 15 सामने दिल्लीने जिंकले आहेत तर, कोलकाताने एकूण 17 सामन्यात आपलं वर्चस्व दाखवले आहेत, आणि एका सामन्यात कोणत्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही. तर आज बघण्यायोग्य गोष्ट असणार की, दिल्ली केकेआरला हरवुन आपला 16 विजय निश्चीत करणार का?

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link