LSG vs KKR highlights, IPL 2024 : केकेआरचा 98 धावांनी लखनऊवर दणदणीत विजय

Sun, 05 May 2024-11:20 pm,

LSG vs KKR Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 54 व्या सामन्यात आज लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders) या दोघं संघात सामना होणार आहे.

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Match  Live Score in Marathi: आज आयपीएलच्या 54 व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स (LSG) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमने सामने असणार आहे. हा सामना लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) करणार आहे. तर केएल राहुल (KL Rahul) एलएसजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बघण्यायोग्य गोष्ट असणार की, बलाढ्य कोलकातासमोर लखनऊ आपल्या होमग्राउंडवर बाजी मारणार की नाही?

Latest Updates

  • कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 98 धावांनी लखनऊ सुपर जाएंट्सवर विजय मिळवला आहे आणि यासोबतच 2 पॉइंट्ससोबत, पॉइंट्स टेबलच्या पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. 

  • 15 ओव्हरनंतर लखनऊ सुपर जाएंट्सचा स्कोर 130-8 असा आहे. या स्थितीतून लखनऊला जिंकण्यासाठी 28 बॉलमध्ये 105 धावा लागत आहेत.

  • 15 व्या ओव्हरमध्ये हर्षित राणाने क्रुणाल पांड्याची विकेट घेतली आहे. पांड्या हा 5 धावांवर बाद झाला आहे. रवी बिश्नोई आता फलंदाजीसाठी आला आहे.

  • वरूण चक्रवर्तीने 15 व्या ओव्हरमध्ये एश्टन टर्नरला 16 धावांवर बाद केलं आहे. या विकेटनंतर फलंदाजी करण्यासाठी युधवीर चरक आला आहे.

  • सुनील नरेन याने 13 व्या ओव्हरमध्ये आयुष बदोनीला पण 15 धावांवर आउट केलं आहे. या विकेटनंतर क्रुणाल पांड्या हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • आंद्रे रसल याने परत एकदा 12 व्या ओव्हरमध्ये लखनऊला आणखी एक धक्का बसला आहे. पाचव्या विकेटनंतर एश्टन टर्नर हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • 10 व्या ओव्हरमध्ये आंद्र रसलने लखनऊला मार्कस स्टॉयनिसच्या रूपात आणखी एक धक्का दिला आहे. स्टॉयनिस हा 36 धावांवर आ बाद झाला आहे. चौथ्या विकेटनंतर आयुष बदोनी हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • 9 व्या ओव्हरमध्ये वरूण चक्रवर्तीने, दिपक हूड्डा याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे आणि फक्त 5 धावांवर तंबूत परत पाठवलं आहे. तिसऱ्या विकेटनंतर निकोलस पूरन हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • 8 व्या ओव्हरमध्ये हर्षित राणाच्या गोलंदाजीवर, लखनऊचा कॅप्टन के एल राहूल हा 25 धावांवर आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर दिपक हूड्डा हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • 5 ओव्हरनंतर लकनऊचा स्कोर हा 47-1 असा आहे. के एल राहूल हा 18 धावांवर, तर स्टॉयनिस पण 18 धावांवर त्याचे साथ देत आहे. या स्थितीत लखनऊला जिंकण्यासाठी 90 बॉलमध्ये 189 धावांची गरज आहे.

  • दुसऱ्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर लखनऊचा युवा फलंदाज अर्शिन कुलकर्णी हा 9 धावांवर आउट झाला आहे. तर पहिल्या विकेटनंतर मार्कस स्टॉयनिस हा फलंदाजी करण्यासाठी आला आहे.

  • 20 ओव्हरनंतर कोलकाता नाईट रायडर्सने, लखनऊ सुपर जाएंट्ससमोर 236 धावांचे लक्ष दिले आहे. फलंदाजीत केकेआरकडून सुनील नरेन याने सर्वात जास्त 81 धावा केल्या आहेत, तर फिलीप सॉल्ट आणि अंगक्रिस रघुवंशी या दोघांनी 32 धावांचे योगदान दिले आहे. लखनऊकडून गोलंदाजीत नवीन उल हक याने 3, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि युद्धवीर सिंग चरक या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    तर आता बघण्यायोगय गोष्ट असणार की, लखनऊची घातक फंलदाजी 236 धावांच्या लक्षाला कोलकाताच्या चांगल्या गोलंदाजीसमोर 20 ओव्हरमध्ये चेस करू शकणार की नाही.

     

     

     

     

  • 16 व्या ओव्हरमध्ये युद्धवीर चरक याने, अंगक्रिश रघुवंशीला 32 धावांवर आउट केलं आहे. चौथ्या विकेटनंतर श्रेयस अय्यर हा फलंदाजीसाठी आलायं.

  • 15 व्या ओव्हरमध्ये नवीन उल हकच्या ओव्हरमध्ये आंद्रे रसल हा 12 धावांवर आउट झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर रिंकू सिंग हा फलंदाजीसाठी आलाय, तर 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर केकेआरचा स्कोर 171-3 असा आहे.

  • 12 व्या ओव्हरमध्ये, लखनऊचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याने घातक दिसत असणाऱ्या सुनील नरेन याला 81 धावांवर आउट केलं आहे. सुनील नरेनच्या विकेटनंतर आंद्रे रसल हा फंलदाजीसाठी आला आहे.

  • केकेआरकडून सुनील नरेन याने 27 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. तर 10 ओव्हरच्या , समाप्तीनंतर केकेआरचा स्कोर 110-1 असा आहे.

  • 6 ओव्हरनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा स्कोर 70-1 असा आहे. सुनील नरेन हा 31 धावांवर खेळतोय, तर रघुवंशी हा 6 धावांवर त्याचे साथ देत आहे.

  • 5 व्या ओव्हरमध्ये, नवीन उल हकच्या गोलंदाजीवर घातक दिसत असणारा केकेआरचा फलंदाज फिल सॉल्ट हा 32 धावांवर आउट झाला आहे. तर पहिल्या विकेटनंतर अंगक्रिश रघुवंशी हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • LSG vs KKR toss update : लखनऊ सुपर जाएंट्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    LSG प्लेइंग 11 -

    केएल राहुल (C/W), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर

    KKR प्लेइंग 11 - 

    फिलिप सॉल्ट (W), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (C), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

  • चेन्नई सुपर किंग्सने, पंजाब किंग्सवर 28 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चेन्नईच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे चेन्नईने या सामन्यात एकतर्फी वर्चस्व दाखवले आणि महत्वाचे 2 पॉइंट्सही आपल्या खिशात टाकून प्लेऑफसाठी एक पाऊल पूढे टाकले.

  • KKR vs LSG हेड टू हेड

    आयपीएलच्या आतापर्यंतच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स पूर्णपणे कोलकाता नाईट रायडर्सवर वर्चस्व गाजवलं आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 4 सामने झाले आहेत. लखनऊ हे तीन सामने जिंकले आहेत. केकेआरने फक्त एक सामना जिंकलेला आहे. एलएसजीविरुद्ध केकेआरची सर्वोच्च धावसंख्या 208 आहे. तर, केकेआरविरुद्ध एलएसजीची सर्वोत्तम धावसंख्या 210 धावा आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link