LSG vs PKBS Live Score : लखनऊची पंजाबवर 21 धावांनी मात

Saurabh Talekar Sat, 30 Mar 2024-11:23 pm,

LSG vs PBKS, IPL 2024 : लखनऊ सुपर जाएंट्स आपला आयपीएल 2024 चा दुसरा सामना आपलं होमग्राउंड मानल्या जाणाऱ्या लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाणा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.

Lucknow Super giants vs Pujab Kings score updates : एलएसजीने आतापर्यंत फक्त एक मॅच खेळलेली आहे आणि त्यात पण लखनऊला पराभव पत्करावा लागला होता. आता लखनऊ आज होम कंडिशन्सचा फायदा घेऊ शकणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंजाब किंग्स दुसऱ्या बाजूला दोनपैकी एक मॅच जिंकत पॉईंट्स टेबलच्या पाचव्या क्रमांकावर आहे, तर पंजाबसमोर आज लखनऊचं कडवं आव्हान असणार आहे आणि आजची मॅच जिंकून पॉईंट्स टेबलवर वरचे स्थान मिळवण्याची खूप चांगली संधी सुद्धा आज पंजाबकडे आहे.

Latest Updates

  • मयंक यादव आणि मोहसिन खानच्या घातक गोलंदाजीमूळं लखनऊ सूपर जाएंट्सच्या संघाने पंजाब किंग्सवर 21 धावांनी सहज विजय नोंदवला आहे.

  • मोहसीन खानने 17 व्या ओव्हरीत बॅक-टू-बॅक विकेट घेत लखनऊचे पारडं जड केलं आहे, आणि पंजाबच्या टीमला कठिण परिस्थितीत टाकलं आहे. मोहसिन खानने  एकाच ओव्हरमध्ये धवन आणि करण या दोघं महत्वाच्या विकेट घेतलेल्या आहे

  • मयंक यादव लखनऊसाठी उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे, पंजाबच्या जितेश शर्माला मयंक यादवने आपल्या गतीच्या जाळ्यात फसवून 16 व्या ओव्हरीत बाद केलं आहे. 

  • 15 ओव्हरनंतर पंजाबचा स्कोर आहे, 136-2, शिखर धवनने पंजाबची एक बाजू सांभाळून ठेवली आहे, तर त्याचा साथ द्यायला जितेश शर्मा आहे.

  • मयंक यादवने परत एकदा लखनऊच्या संघाला मॅचमध्ये परत आणलं आहे. 14 व्या ओव्हरमध्ये मयंकने प्रभसिमरन सिंगला बाद केले

  • 12 व्या ओव्हरमध्ये लखनऊच्या यूवा गोलंदाज मयंक यादवने जॉनी बेअरस्टोला 42 धावांवर कॅच आऊट केले. 12 व्या ओव्हरनंतर पंजाबची 107-1 ही स्थिती आहे.

  • 10 ओव्हरनंतर पंजाबचा स्कोर 98-0 पोहोचला आहे. धवन आणि बेयरस्टो यांच्यातील भागीदारी लखनऊसाठी डोके-दूखी ठरत आहे, अशातच लखनऊच्या टीमला ही भागीदारी तोडणं महत्वाच झालेलं आहे.

  • इनिंगच्या आठव्या ओव्हरमध्ये शिखर धवनने 31 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं आहे. धवनसोबत जॉनी बेअरस्टोसुद्धा 36 धावांंवर खेळत आहे. या भागीदारीमूळे पंजाब मजबूत स्थितीत आली आहे.

  • 5 ओव्हरनंतर पंजाबकडून बेअरस्टो-धवनच्या जोडीने संघाला ताबडतोब सुरूवात दिली आहे. धवन 26 तर बेअरस्टो 19 वर खेळत आहे. एकही विकेट न गमावता पंजाबने 45 रन्स बनवले आहेत. 

  • 20 ओव्हरच्या समाप्तीनंतर लखनऊने 199 धावांपर्यंत मजल मारली आहे. लखनऊकडून डिकॉकने 54, पूरनने 42 तर इतर फलंदाजांनीसुद्धा आपले योगदान दिलं. पंजाबच्या गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंगने 2, सॅम करणने 3 आणि रबाडा आणि चहरने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे. 

    लखनऊच्या फलंदाजांनी पावरप्लेमध्ये चांगल्या पद्धतीची सुरूवात केली, पण मधल्या ओव्हर्समध्ये थोडी फलंदाजी डामाडोल झाली होती. त्या परिस्थितीतून पूरनने लखनऊला सावरले आणि शेवटी कृणालने शेवटी येऊन मोठे फटके मारले आणि लखनऊला आव्हानात्मक धावांपर्यंत पोहोचोवले. आता बघण्यायोग्य असेल की, पंजाब आज आपला दूसरा विजय नोंदवते की, लखनऊ पंजाबला घरच्या मैदानावर पराभूत करते?

  • पंजाबच्या सॅम करणच्या 19 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट पटकावल्या आहेत, बदोनी आणि बिश्नोईला तंबूत परत धाडले आहे आणि लखनऊचा स्कोर आहे 191-7

  • 16 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा स्कोर 146/5 असा आहे. निकोलस पूरन 21 बॉलमध्ये 42 रन बनवून आऊट झाला आहे. पूरनच्या जागेवर क्रृणाल पांड्या हा बॅटिंगसाठी मैदानात आला आहे. 

  • 14 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा सेट बॅट्समन डिकॉक हा 54 धावा बनवून अर्शदीपच्या गोलंदाजीवर आऊट झाला आहे.

  • लखनऊचा स्टार ओपनर क्विंटन डिकॉकने 13 व्या ओव्हरमध्ये 34 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केले आणि लखनऊला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले आहे.

  • 10 व्या ओव्हरनंतर लखनऊची चिंता थोडी वाढलेली आहे, कारण लखनऊचे तिन महत्वाचे फलंदाज तंबूत परतलेले आहे, सध्या डिकॉकने एक बाजू सांभाळून ठेवलीये आणि कॅप्टन निकोलस पूरण बॅटिंगसाठी आला आहे. एलएसजी 10 ओव्हरनंतर 88-3 च्या स्थितीत आहे.

  • 9 व्या ओव्हरमध्ये राहूल चहरने तडाखेदार फलंदाज मार्कस स्टॉइनिसला 19 रनांवर बोल्ड केलं आहे. राहूल चहरने या ओव्हरमध्ये दोन छक्के खाऊन शेवटी मात्र चौथ्या बॉलवर स्टॉइनिसला बाद केलं.

  • सहाव्या ओव्हरमध्ये देवदत्त पडिकल हा सॅम करणच्या बॉलिंगवर आऊट झाला आहे. 5.1 ओव्हरनंतर एलएसजीचा स्कोर आहे 45-2 आणि या विकेटनंतर मार्कस स्टॉयनिस हा फलंदाजीसाठी आलेला आहे.

  • लखनऊला चौथ्या ओव्हरमध्ये के एल राहूलच्या स्वरूपात फार मोठा धक्का बसलेला आहे, राहूल हा अर्शदीपच्या बॉलिंगवर 15 धावाकरून बाद झाला. 

  • लखनऊ सूपर जाएंट्सचा मोठा निर्णय घेतलाय. आजच्या मॅचमध्ये के एल राहूल हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत आहे. तर टीमचे नेतृत्व आज निकोलस पूरनच्या हाती सोपवलेले आहे. 

  • लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (C), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.

    पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, जितेश शर्मा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link