MI vs KKR highlights, IPL 2024 : वानखेडेमध्ये केकेआरचा रॉयल विजय, मुंबई इंडियन्सविरूद्ध नोंदविला 24 धावांनी विजय

Fri, 03 May 2024-11:21 pm,

MI vs KKR Live Score, IPL 2024 : आज आयपीएल 2024 च्या 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना इन फॉर्म कोलकाता नाइट रायडर्सशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live Score in Marathi: आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन अपेक्षेप्रमाणे झालेले नाहीये. आतापर्यंत मुंबईचा संघ 10 मधून फक्त 3 सामने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. तर पॉइंट्सटेबलमध्ये पण मुंबईचा संघ 9 व्या स्थानावर आहे. तर याउलट केकेआरचा संघ अतिशय दमदार फॉर्ममध्ये असून आतापर्यंत झालेल्या 9 सामन्यांपैकी त्यांनी तब्बल 6 सामने जिंकलेले आहेत आणि विशेष म्हणजे, कोलकाताचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज बघण्यायोग्य होणार की, वानखेडेच्या सपाट पिचवर कोणता संघ गोलंदाजांचा कस काढणार आणि आपल्या संघाचा विजयी झेंडा वानखेडेत फडकवणार आहे. 

Latest Updates

  • 16 व्या ओव्हरमध्ये आंद्रे रसल याने मुंबई इंडियन्सचा सेट फलंदाज सुर्यकुमार यादव याला 56 धावांवर आउट केलं आहे. सातव्या विकेटनंतर कोएट्झे हा फलंदाजीसाठी आलाय.

  • 15 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 119-6 असा आहे. मुंबई इंडियन्सला या स्थितीतून जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे.

  • 15 व्या ओव्हरमध्ये मुंबईच्या सुर्यकुमार यादव याने 30 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 10 ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 67-4 असा आहे. नेहाल वढेरा हा 5 धावांवर खेळतोय, तर सुर्यकुमार यादव हा 19 धावांवर खेळत आहे.

  • 9 व्या ओव्हरमध्ये वरूण चक्रवर्तीने तिलक वर्माला फक्त 4 धावांवर आउट केलं आहे. तर चौथ्या विकेटनंतर नेहाल वढेरा हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • सुनील नरेन याने 6 व्या ओव्हरमध्ये मुंबईचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याला 11 धावांवर आउट केलं आहे. तिसऱ्या विकेटनंतर तिलक वर्मा हा फलंदाजीसाठी आला आहे. 

  • 5 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मुंबई इंडियन्सचा स्कोर 41-2 असा आहे. रोहित शर्मा हा 11 धावांवर खेळतोय, तर ,सुर्यकुमार यादव हा नुकताच फलंदाजीसाठी मैदानात आला आहे, तो ही 2 धावांवर खेळत आहे.

  • वरूण चक्रवर्तीने 5 व्या ओव्हरमध्ये नमन धीरला 11 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे. दुसऱ्या विकेटनंतर सुर्यकुमार यादव हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • मिचेल स्टार्कने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये इशान किशनला 13 धावांवर आउट केलं आहे. पहिल्या विकेटनंतर नमन धीर हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • 20 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने, मुंबई इंडियन्ससमोर 170 धावांचे आव्हान दिले आहे. केकेआरकडून फलंदाजीत निराशाजन प्रदर्शन राहिले फक्त वेंकटेश अय्यर याने 70 धावांची खेळी खेळलीये, तर मनीष पांडे याने 42 धावांची इनिंग खेळलेली आहे. मुंबईकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा याने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहे, तर पांड्याने 2 आणि पियूष चावलाने 1 विकेट घेतलीये. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    आता बघण्यायोग्य असणार की मुंबईच्या होमग्राउंडवर कोलकाता हा सामना जिंकू शकणार? की मुंबई आपल्या तूफानी फलंदाजीचे प्रदर्शन करत सामना आपल्या खिशात टाकणार.

     

  • 17 व्या ओव्हरमध्येच दुर्देवाने आंद्रे रसल हा 7 धावा करून रन आउट झाला आहे. तर सातव्या विकेटनंतर रमनदीप सिंग हा फलंदाजीसाठी आलाय.

  • 17 व्या ओव्हरमध्ये मनीष पांडे हा 42 धावांवर, हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर आउट झाला आहे. सहाव्या विकेटनंतर आंद्रे रसल हा फलंदाजी साठी आला आहे.

  • 15 व्या ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर 128-5 असा आहे. वेंकटेश अय्यरने 36 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे, तर मनीष पांडे हा सुद्धा 36 धावांवर खेळत आहे. पांडे आणि वेंकटेश या दोघांमध्ये 76 धावांची भागीदारी झाली आहे.

  • 10 ओव्हरनंतर मनीष पांडे आणि वेंकटेश अय्यर या दोघं फलंदाजांनी केकेआरच्या फलंदाजीला सांभाळलं आहे. पांडे हा 15 धावांवर, तर वेंकटेश हा 23 धावांवर फलंदाजी करतोय. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर केकेआरचा स्कोर 83-5 असा आहे.

  • पियूष चावला याने 7 व्या ओव्हरमध्ये रिंकू सिंगला 9 धावांवर आउट झाला आहे. पाचव्या विकेटनंतर मनिष पांडे हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीसाठी आलाय.

  • 5 ओव्हरनंतर केकेआरची स्थिती थोडी वाईट आहे. वेंकटेश अय्यर हा 8 धावांवर, तर रिंकू सिंगही 8 धावांवर खेळतोय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोलकाताचा स्कोर 51-4 असा आहे.

  • 5 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने सुनिल नरेन याला 8 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे. तर आता चौथ्या विकेटनंतर रिंकू सिंग हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • नुवान तुषाराने तिसऱ्या ओव्हरमध्ये केकेआरच्या दोन फलंदाजांना तंबूत परत पाठवलं आहे. रघुवंशी हा 13 धावांवर, तर श्रेयस अय्यर हा 6 धावांवर आउट झाला आहेय तर आता वेंकटेश अय्यर हा फलंदाजीसाठी आलाय.

  • नुवान तुषाराने पहिल्या ओव्हरमध्येच केकेआरचा घतक ओपनर फिल सॉल्ट याला पाच धावांवर आउट केलं आहे. पहिल्या विकेटनंतर अंगक्रिश रघुवंशी फलंदाजीसाठी आला आहे.

  • MI vs KKR toss update - मुंबई इंडियन्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MI प्लेइंग 11 -

    इशान किशन (W), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (C), नमन धीर, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

    KKR प्लेइंग 11 -

    फिलिप सॉल्ट (W), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (C), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

  • MI vs KKR संभाव्य 11 -

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मुंबई इंडियन्स संभाव्य 11 -
    इशान किशन (W), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

    कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य 11 -
    फिल सॉल्ट (W), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (C), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती.

  • MI vs KKR head to head -

    आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे एकूण 32 वेळेस आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने एकतर्फी वर्चस्व दाखवत तब्बल 23 सामन्यात विजय मिळवला आहे, तर केकेआरने 9 सामन्यात मुंबईला पराभूत केलं आहे.

  • MI vs KKR head to head -

    आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे एकूण 32 वेळेस आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने एकतर्फी वर्चस्व दाखवत तब्बल 23 सामन्यात विजय मिळवला आहे, तर केकेआरने 9 सामन्यात मुंबईला पराभूत केलं आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link