कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं ३-०नं शानदार विजय मिळवला. या सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा लोकेश राहुल त्याच्या करिअरच्या सर्वोच्च रॅकिंगवर पोहोचला आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या बॅट्समनच्या रॅकिंगमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. याचबरोबर बॅट्समनच्या टॉप १० रॅकिंगमध्ये चेतेश्वर पुजारा चौथ्या, विराट कोहली पाचव्या आणि अजिंक्य रहाणे दहाव्या क्रमांकावर आहे. बॅट्समनच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये राहुलनं शिखर धवनबरोबर १८८ रन्सची पार्टनरशीप केली होती, यामध्ये राहुलनं ८५ रन्स केल्या. राहुलबरोबरच तिसऱ्या टेस्टमध्ये १०८ रन्सची वादळी खेळणारा हार्दिक पांड्या बॅट्समनच्या रॅकिंगमध्ये ६८व्या क्रमांकावर पोहोचला आहे.


बॉलर्सची रॅकिंगही सुधारली


मोहम्मद शमी आणि उमेश यादवनंही या सीरिजमध्ये चांगलं प्रदर्शन केलं. यामुळे टेस्ट रॅकिंगमध्ये शमी १९व्या तर उमेश यादव २१ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. कुलदीप यादवही २९ स्थानांची मोठी उडी घेत ५८व्या स्थानावर पोहोचला आहे. तर या यादीमध्ये रवींद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर आणि आर. अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशांच्या रॅकिंगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.