मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तारखा जाहीर झाल्यानंतर सगळेच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. याचसोबत आता निवडणूक आयोगानेही मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगानं मतदान करण्याच्या प्रचारासाठी राज्यातल्या दिग्गजांची यादी तयार केली आहे. यामध्ये साहित्यिक, खेळाडू, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. क्रिकेटपटू स्मृती मंधना, ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणारा स्विमर वीरधवल खाडे, शूटर राही सरनोबत, धावपटू ललिता बाबर हे खेळाडू मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या ७ टप्प्यांपैकी पहिल्या ४ टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ जागांसाठीचं मतदान होईल. महाराष्ट्रात ११ एप्रिलला ७ मतदारसंघात, १८ एप्रिलला १० मतदारसंघात, २३ एप्रिलला १४ मतदारसंघात आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान होईल.


लोकसभा निवडणूक : तुमच्या मतदारसंघात या तारखेला होणार मतदान


 


हे दिग्गज करणार मतदानासाठी जनजागृती


अनिल काकोडकर- शास्त्रज्ञ


मधू मंगेश कर्णिक- साहित्यिक 


स्मृती मंधाना- महिला क्रिकेटपटू


मृणाल कुलकर्णी- अभिनेत्री 


वीरधवल खाडे- स्विमर 


राही सरनोबत- शूटर 


ललिता बाबर- धावपटू


प्रशांत दामले- अभिनेता 


निशिगंधा वाढ- अभिनेत्री


उषा जाधव- अभिनेत्री


गौरी सावंत- तृतीय पंथियांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या


निलेश सिंगित- सामाजिक कार्यकर्ते


क्रिकेटसोबतच ऋषभ पंतची नवी इनिंग, निवडणूक प्रचार करणार