Hardik Pandya: `काय सुरुयेss...` हार्दिक पंड्याच्या खराब फिल्डींगवर नवख्या खेळाडूची आगपाखड; Video Viral
Hardik Pandya: डेब्यू करणारा तुषार गोलंदाजी करत असताना राजस्थान रॉयल्सचा ओपनर यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत होता. यावेळी जयस्वालने एक्स्ट्रा कव्हर आणि मिड-ऑफच्या ठिकाणी सुंदर ड्राइव्ह खेळला.
Hardik Pandya: सोमवारी जयपुरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात 29 वर्षीय वेगवान गोलंदाज नुवान तुषारा याने आयपीएलमध्ये डेब्यू केलं. यावेळी मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला कॅप दिली. लसिथ मलिंगसारखी स्लिंगिंग ॲक्शन असलेल्या नुवानने 3 ओव्हर्समध्ये 28 रन्स खर्च केले. मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. यादरम्यान एक प्रसंग असा घडला ज्यामुळे तो हार्दिक पांड्यासोबत खूश दिसत नव्हता. नेमकं हे प्रकरण काय आहे, पाहुयात.
डेब्यू करणारा तुषार गोलंदाजी करत असताना राजस्थान रॉयल्सचा ओपनर यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत होता. यावेळी जयस्वालने एक्स्ट्रा कव्हर आणि मिड-ऑफच्या ठिकाणी सुंदर ड्राइव्ह खेळला. यावेळी बॉल सहज रोखता आला असता, पण कर्णधार हार्दिकने डाईव्ह देऊनही बॉल रोखण्यात यश आलं नाही. यावेळी हार्दिकचे हे प्रयत्न नुवानला हे फारसे आवडले नाही. यावेळी फोर गेला आणि त्याच्या ओव्हरमध्ये 17 रन्स खर्च झाले.
सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ
हार्दिकच्या फिल्डींगनंतरही चौकार गेल्याने नुवान तुषारा नाराज दिसला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तुषारा शेवटच्या बॉलनंतर संतापलेला दिसतोय. यावेळी संतापाच्या भरात तो केवळ हार्दिकडे पाहतो आणि निघून जातो. दरम्यान हार्दिक पंड्या यावर काहीही प्रतिक्रिया देत नाहीये. मात्र नुवान तुषारा हार्दिकच्या फिल्डींगवरून वैतागल्याचं या व्हिडीओमधून दिसून येतंय.
राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर विजय
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिलक वर्माने मुंबई टीमकडून सर्वाधिक 65 रन्स केले. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 180 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. पण हे लक्ष्य राजस्थानच्या फलंदाजांनी सहज गाठलं. संजू सॅमसनच्या टीमने केवळ 1 विकेट गमावून लक्ष्य गाठलं. या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या शानदार शतकी खेळी केली. यशस्वी जयस्वालने नाबाद 104 रन्स केले. तर संजू सॅमसनने 28 बॉल्समध्ये 38 रन्स करून नाबाद राहिला.
मुंबईला प्लेऑफ गाठण्याची संधी?
मुंबई इंडियन्सला आणखी 6 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आता मुंबईला जर प्लेऑफ गाठायचं असेल तर उर्वरित 6 सामन्यांपैकी 5 सामने तरी जिंकावे लागणार आहेत. या 6 सामन्यांपैकी मुंबईला लखनऊविरुद्ध 2 आणि केकेआरविरुद्ध 2 सामने खेळायचे आहेत. तर तगड्या हैदराबादसोबत 1 सामना तर दिल्लीविरुद्ध देखील 1 सामना खेळायचा आहे.