मुंबई : लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात आजपासून कसोटी सामना खेळवला जात आहे.या सामन्याच्या 23 ओव्हरनंतर अचानक सामना थांबवत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज दिवंगत शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी न्यूझीलंडच्या डावात 23 षटकांनंतर सामना 23 सेकंदांसाठी थांबवण्यात आला आणि शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये 23 वे षटक संपल्यानंतर शेन वॉर्नला मैदानावरील स्क्रीनवर दाखवण्यात आले आहे. दरम्यान, चाहते, खेळाडू आणि पंचांसह इतर सर्वांनी उभे राहून वॉर्नच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवल्या.


शेन वॉर्नचा थायलंडमध्ये मृत्यू 


शेन वॉर्नचा या वर्षी ४ मार्च रोजी थायलंडमध्ये मृत्यू झाला होता. वयाच्या ५२ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या वॉर्नला हॉटेलच्या खोलीतच हृदयविकाराचा झटका आला. शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्टीसाठी गेला होता. शेन वॉरने आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवत अनेक क्रिकेटपटूंची विकेट घेतली होती.वॉर्नने त्याच्या 145 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत 708 बळी घेतले आहेत.  मुथय्या मुरलीधरन (800 बळी) घेतले होते, त्यानंतर वॉर्नचा नंबर लागतो.  


न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय चुकला 
लॉर्ड्सवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. उपाहारापर्यंत किवी संघाने 39 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. यानंतर संघाच्या 102 धावांवर 9 खेळाडू बाद झाले. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मॅटी पॉट्स आणि अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी पदार्पण करत 4-4 विकेट घेतल्या.