LSG Vs MI: पता है!! मुंबई मॅच कुठं हारली? पराभवानंतर तुफान Viral होतोय Video!
LSG Vs MI, IPL 2023: मैदानात तणावपूर्ण वातावरण होतं. लखनऊसाठी हा महत्त्वाचा सामना असल्याने संघाचे मालक मैदानात सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. एलएसजी (Lucknow Super Giants) संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) खिश्यात एक फोटो घेऊन आले.
Sanjiv Goenka, Viral Video: आयपीएल 2023 च्या हंगामातील 63 व्या सामन्यात, कोणालाही अपेक्षा नव्हती असा विजय लखनऊने मुंबईविरुद्ध (LSG Vs MI) नोंदवला आहे. महत्त्वपूर्ण सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजलं. या पराभवामुळे मुंबईचं प्लेऑफचं (IPL Playoffs) गणित किचकट झालंय. लखनऊने 20 षटकात177 धावा केल्या आणि विजयासाठी 178 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईचा संघ 20 ओव्हरमध्ये 171 धावा करू शकला. कॅमरून ग्रीन आणि टीम डेव्हिड सारखे फलंदाज मैदानात असताना मुंबईला लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. या सामन्यानंतर आता एक व्हिडिओ (Viral Video) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
सामना रंगतदार स्थितीत आला होता. कॅमरून ग्रीन आणि टीम डेव्हिड यांच्यासारखे जगातील सर्वोत्तम टी-ट्वेंटी फलंदाज मैदानात पाय रोवून उभे होते. तर दुसरीकडे तुटका फुटका मोहसिन खान (Mohsin Khan). गेल्या अनेक दिवसांपासून दुखापतीमधून कमबॅक करणाऱ्या मोहसिनने स्वत:ला शांत करत गोलंदाजी सुरू केली. मैदानात तणावपूर्ण वातावरण होतं. लखनऊसाठी हा महत्त्वाचा सामना असल्याने संघाचे मालक मैदानात सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. एलएसजी संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) खिश्यात एक फोटो घेऊन आले. प्रत्येक बॉलवेळी ते फोटो काढून पाया पडत असल्याचं दिसून आलं. मोहसीन आणि संघासाठी देवाकडे प्रार्थना करत होते, त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
पाहा Video
गोयंकांच्या प्रार्थना फळाला आल्या आणि लखनऊला हा महत्त्वाचा सामना जिंकण्यात यश मिळालं. मागील आयपीएल (IPL 2023) हंगामावेळी मुंबई इंडियन्सच्या मालकीन नीता अंबानी देखील अतितटीच्या सामन्यात देवाला प्राथर्ना करताना दिसतात. तर मुंबईच्या आजीबाई सर्वांच्या लक्षात असतील. आयपीएल आणि देवाची श्रद्धा हा एक नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ... कधी काय होईल सांगता येत नाही. मात्र, देवी विश्वास सामना जिंकवतो का? असा सवाल आता क्रिडाविश्वात चर्चेत आहे.
दरम्यान, मी स्कोरबोर्डकडे न पाहता स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि 6 चेंडू चांगले टाकले. मी स्लोअर बॉलचा प्रयत्न केला, पण मी त्यापैकी दोन टाकले गेले . त्यानंतर यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला आणि मला यश आलं, असं म्हणत मोहसिन खानने यशाचं गुपित सांगितलं आहे. मुंबईचा पराभव केल्यामुळे आता लखनऊचा प्लेऑफचा टप्पा आणखी सोपा झाला आहे. आगामी सामन्यात लखनऊचा एक विजय प्लेऑफचं तिकीट कन्फर्म करेल.