IPL 2024 : केएल राहुलला टेन्शन! `हा` स्टार गोलंदाज आयपीएलमधून बाहेर
Shivam Mavi ruled out of IPL 2024 : लखनऊ सुपर जाएन्ट्सला मोठा धक्का बसला असून एका स्टार गोलंदाजीची आयपीएलमधून एक्झिट झाली आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या सुरूवातील लखनऊला मोठा बसलाय.
Lucknow Super Giants : आयपीएलला आता रंगतदार सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातच अनपेक्षित सामने पहायला मिळाल्याने आता उर्वरित आयपीएलची चुरस आणखीच वाढली आहे. अशातच पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता लखनऊचा (LSG) संघ पुन्हा रुळावर आला आहे. मागील दोन्ही सामन्यात विजय मिळवून लखनऊने 4 अंक खिशात घातले आहेत. 3 सामन्यात 4 अंक घेऊन लखनऊकडे 0.483 चा नेट रनरेट आहे. तर लखनऊचा संघ अंकतालिकेत चौथ्या स्थानी आहे. अशातच आता लखनऊला मोठा धक्का बसला आहे. लखनऊ सुपर जाएन्ट्सचा स्टार गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi) दुखापतग्रस्त असल्याने आयपीएलमधून (Shivam Mavi ruled out of IPL 2024) बाहेर पडला आहे. त्यामुळे आता कॅप्टन केएल राहुलचं (KL Rahul) टेन्शन वाढलंय. लखनऊने यावर पत्रक देखील जाहीर केलंय.
LSG ने काय म्हटलंय?
लखनऊ सुपर जायंट्सचा शिवम मावी दुर्दैवाने दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. प्रतिभावान शिवम मावी डिसेंबरमध्ये लिलावानंतर आमच्यात सामील झाला आणि पूर्व-हंगामापासून शिबिराचा भाग आहे. तो मोसमासाठी संघाचा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे त्याचा हंगाम इतक्या लवकर संपल्यानं आम्ही आणि शिवम निराश आहोत. फ्रँचायझी शिवमला पाठिंबा देत राहील आणि त्याच्या फीट होण्यासाठी त्याला मदत करण्यास आम्ही वचनबद्ध आहे. आम्ही त्याला जलद आणि पूर्ण पुनरागमनासाठी शुभेच्छा देतो आणि खात्री आहे की तो पुन्हा फिट आणि मजबूत होईल, असा विश्वास लखनऊ सुपर जाएन्ट्सने व्यक्त केला आहे.
शिवम मावी म्हणतो...
लखनऊ सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिवम मावीने भावना व्यक्त केल्या. मला तुमची नक्कीच आठवण येईल. दुखापतीनंतर मी इथं खेळण्यासाठी आलो होतो आणि मला संघासाठी सामने खेळण्याची संधी मिळेल असं मला वाटलं होतं. मात्र, दुर्देवाने असं झालं नाही. मला वाटतं की, प्रत्येक खेळाडूने अशा काळात मानसिकदृष्ट्या सक्षम असायला हवं. तुम्ही दुखापतीची काळजी घेतली पाहिजे अन् पुनरागमन केलं पाहिजे. आपण नक्कीच लखनऊ संघाच्या विजयासाठी चिअर्स करू, असंही शिवम मावीने म्हटलं आहे.
लखनऊचा संपूर्ण स्कॉड - क्विंटन डी कॉक, केएल राहुल (C), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ, शामर जोसेफ, दीपक हुडा, अमित मिश्रा, कृष्णप्पा गौतम, मोहसिन खान, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, मॅट हेन्री, प्रेरक मंकड, शिवम मावी, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, अर्शीन कुलकर्णी.