Ayush Badoni Viral Video: अतितटीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून प्लेऑफचं तिकीट मिळवणाऱ्या लखनऊचा (Lucknow Super giant) आगामी सामना हा पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या संघासह असणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर 24 मे रोजी हा एलिमिनेटर (LSG vs MI Eliminator) सामना खेळला जाईल, या सामन्यात जिंकणारा संघ क्वालिफायर टू साठी जाणार आहे तर पराभूत संघाला गाशा गुंडावा लागणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ सध्या जोरदार तयारी करताना दिसत आहेत. अशातच आता धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अष्टपैलू कृणाल पांड्या (Krunal Pandya) याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. इलिमिनेटर सामन्याआधी संघाच्या एका खेळाडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून लखनऊला अनेक सामने जिंकून देणारा आयुष बडोनी (Ayush Badoni Viral Video) याचा आहे. संघाच्या सरावाचा एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय. त्यावेळी शॉट घेण्याचा प्रयत्न करताना आयुषने मोठी चूक केल्याचं दिसून आलंय.


आणखी वाचा - GT vs CSK Qualifier 1 : कोणाचं पारडं जड? धोनी की पांड्या? जाणून घ्या इतिहास!


लखनऊने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आयुष बडोनी स्कूप शॉट (scoop shot) खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळी त्याचा व्हिडिओ काढण्यात आला. स्कूप शॉट सोडा, आलेला बॉल बदोनीला खेळता आला नाही आणि बॉल नको त्या ठिकाणी (hit ball on i guard) जावून बसला. बॅटवर जाण्याऐवजी चेंडू थेट एल-गार्डवर आदळला. त्यानंतर बदोनी वेदनामुळे जमिनीवर बसल्याचं दिसून आलंय.


पाहा Video



दरम्यान, लखनऊ टीमने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सॉरी आयुष असं कॅप्शनमध्ये लिहिलंय. त्यावर खदाखदा हसलण्याच्या इमोजी देखील टाकल्यात. त्यामुळे आयुष बदोनीला झालेली दुखापत गंभीर नसल्याचं दिसून येतंय.


संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Probable Playing XI)


लखनऊ सुपर जायंट्स (LSG):


क्विंटन डी कॉक (WC), काइल मेयर्स, कृणाल पांड्या (C), प्रेराक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान.


मुंबई इंडियन्स (MI):


रोहित शर्मा (C), इशान किशन (WC), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.