LSG vs PBKS : लखनऊचा पंजाब किंग्जवर `जाएंट` विजय; पंजाबचा घरातच 56 रन्सने पराभव
लखनऊने दिलेल्या 258 रन्सच्या टार्गेटला पंजाब किंग्सच्या टीमने चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र पंजाबच्या फलंदाजांना विजय मिळवून देता आला नाही. लखनऊने पंजाबवर 56 रन्सने विजय मिळवला आहे.
LSG vs PBKS : मोहालीच्या स्टेडियमवर आज पंजाब किंग्स (Pujab Kings) विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow super Giants) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सचा विजय झाला (Lucknow super Giants beat Pujab Kings) आहे. लखनऊने दिलेल्या 258 रन्सच्या टार्गेटला पंजाब किंग्सच्या टीमने चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र पंजाबच्या फलंदाजांना विजय मिळवून देता आला नाही. लखनऊने पंजाबवर 56 रन्सने विजय मिळवला आहे. पंजाबकडून मराठमोळ्या अथर्व तायडेने (Atharva Taide) उत्तम अर्धशतक झळकावलं.
लखनऊकडून पंजाबला 258 रन्सचं आव्हान
पंजाबचा कर्णधार शिखर धवनने आजच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय पंजाबच्या टीमसाठी खूप महागडा ठरला. लखनऊच्या फलंदाजांनी पंजाबच्या जवळपास सर्व गोलंदाजांना चोप दिला. मुंबई विरूद्धच्या सामन्यात हिरो ठरलेल्या अर्शदीप सिंगला 13 च्या इकोनॉमीने रन्स चोपले.
स्टॉयनिस आणि मायर्सची तुफान फटकेबाजी
टॉस हरल्यानंतर लखनऊची टीम फलंदाजीला आली तेव्हा त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. लखनऊचा (Lucknow super Giants) कर्णधार केएल राहुल अवघ्या 12 रन्सवर माघारी परतला. यानंतर काईल मायर्सने मात्र तुफान खेळी झाली. त्याने 24 बॉल्समध्ये 225 च्या स्ट्राइक रेटने 54 रन्सची खेळी खेळली.
यानंतर मार्कस स्टॉयनिसने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. स्टॉयनिसने 6 फोर आणि 5 सिक्सेसच्या मदतीने 72 रन्सची खेळी केली. यामध्ये निकोलस पूरनने देखील त्याला साथ दिली. पूरनने 19 बॉल्समध्ये 45 रन्सची खेळी केली. अखेरीस लखनऊच्या (Lucknow super Giants) टीमने 20 ओव्हर्समध्ये 258 रन्सचं लक्ष्य पंजाबसमोर ठेवलं.
मराठमोळ्या अथर्व तायडेची खेळी व्यर्थ
मराठमोळा खेळाडू अथर्व तायडे आजच्या सामन्यात चांगलाच चमकला. अर्थवने 26 बॉल्समध्ये झंझावाती अर्धशतक ठोकलं. अवघ्या 36 बॉल्समध्ये 66 रन्सची धडाकेबाज खेळी केली. याशिवाय लिव्हिंगस्टोनने 23 आणि सॅम करनने 21 रन्स केले. पंजाबच्या इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.
दुसरा सर्वाधिक स्कोर
लखनऊच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांची हालत खरा केली. लखनऊने (Lucknow super Giants) आजच्या या खेळीमुळे नवा रेकॉर्ड नोंदवला. आयपीएलच्या इतिहासातील लखनऊच्या (Lucknow super Giants) टीमची ही सर्वश्रेष्ठ खेळी होती. 257 हा लखनऊचा दुसरा सर्वाधिक स्कोर असून पहिल्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा नंबर येतो.