IPL 2023 : मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर आज पंजाब किंग्स (Pujab Kings) विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow super Giants) यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्यामध्ये लखनऊच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. 20 ओव्हर्समध्ये लखनऊने 257 रन्स कुटले. आयपीएलच्या इतिहासात हा दुसरा सर्वाधिक स्कोर (Second Highest score) असल्याची नोंद झालीये. त्यामुळे पंजाब किंग्ससमोर डोंगराएवढं आव्हान ठेवण्यात आलंय.


पंजाबने जिंकला होता टॉस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवनचं कमबॅक झालं आहे. यावेळी पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय पंजाबसाठी चांगलाच धोकादायक ठरला. लखनऊच्या फलंदाजांनी 20 ओव्हर्समध्ये 257 रन्सची खेळी केली. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वाधिक स्कोर ठरला आहे.


इतिहासातील दुसरा सर्वाधिक स्कोर


लखनऊच्या टीमने आजच्या या खेळीमुळे नवा रेकॉर्ड नावे केलाय. आयपीएलच्या इतिहासातील त्यांची ही सर्वश्रेष्ठ खेळी होती. 257 हा लखनऊचा दुसरा सर्वाधिक स्कोर असून पहिल्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा नंबर येतो. बंगळूरूने 2013 मध्ये 263 रन्सचा स्कोर उभारला होता. आयपीएलच्या इतिहासात हा सर्वाधिक स्कोर आहे, जो अजूनही कोणी मोडीत काढू शकलेलं नाही.



यंदाच्या सिझनमधील सर्वाधिक स्कोर


यंदाच्या सिझनमध्ये सर्वाधिक स्कोरच्या लिस्टमध्ये चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या स्थानावर होती. यावेळी लखनऊ सुपर जाएंट्सने चेन्नईकडून पहिलं स्थान हिरावलं आहे. चालू सिझनमध्ये सर्वाधिक स्कोर करणारी टीम आता लखनऊ सुपर जाएंट्स बनली आहे. चेन्नईच्या टीमने कोलकाता विरूद्धच्या सामन्यात 4 विकेट्स गमावत 235 रन्स केले होते. तर आजच्या सामन्यात लखनऊच्या टीमने 5 विकेट्स गमावत हा विशाल स्कोर उभा केलाय. 


स्टॉइनिसची तुपान फटकेबाजी


आजच्या सामन्यात मैदानावर स्टॉयनिस नावाचं वादळ पहायला मिळालं. मैदानावर उतरताच स्टॉयनिसने तुफान फटेकबाजीला सुरुवात केली. स्टॉयनिसने 40 बॉल्स मध्ये एकूण 72 रन्स केले. मात्र मोठा शॉट खेळण्याच्या नादात त्याने विकेट गमावली. स्टॉयनिसने आजच्या त्याच्या खेळीत सहा फोर आणि 5 सिक्स लगावलेत.