मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या पत्नीने शस्त्र परवान्याची मागणी केली आहे. साक्षी धोनीने आपल्या जीवाला धोका असल्याच सांगत आर्म्स लायसन्सची मागणी केली आहे. साक्षी अनेकदा घरी एकटी असते तसेच बऱ्याचदा तिला कामासाठी एकटीला फिरावं लागतं. अशावेळी तिच्या जीवाला धोका असल्याची भीती साक्षीला वाटते याकरता तिला शस्त्राची आवश्यकता आहे. त्याकरता तिने पिस्तुल 0.32 रिवॉल्वरचे आवेदन देण्यात आलं आहे. साक्षीने आर्म्स लायसन्स मागितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2010 मध्ये महेंद्र सिंह धोनीला शस्त्र परवाना मिळाला आहे. ज्यानंतर त्याने पिस्तुल खरेदी केली आहे. धोनीला शस्त्र परवानाकरता प्रचंड मेहनत करावी लागली आहे. रांची जिल्हा प्रशासनाने गृह मंत्रालयला आवेदन देण्याकरता 2008 मध्ये धोनीचे चरित्र  प्रमाण पत्र मागितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी धोनीने आर्म्स लायसन्सकरता मजिस्ट्रेट कार्यालयात आवेदन केलं आहे. ज्याकरता अरगोडा पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आल. अरगोडा अंतर्गत केलेल्या चाचणीमध्ये साक्षी धोनीवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. 


3 जुलै रोजी टीम इंडियाचा इंग्लड दौरा सुरू होणार आहे. भारतला इंग्लडविरूद्ध 5 टेस्ट, 3 वन डे आणि 3 टी 20 मॅचची सिरीज खेळण्यात येणार आहे.