m venkatesh 5 wicket haul in ranji trophy debut: एम वेंकटेश (m venkatesh) 12 वा खेळाडू म्हणून मैदानातील खेळाडूंना पाण्याच्या बाटल्या आणि शितपेय आणून देण्याची कामं करत होता. अचानक असं काहीतरी घडलं की त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं. कर्नाटकच्या संघाकडून अचानक खेळण्याची संधी मिळालेल्या वेंकटेशला कर्णधार मयंका अग्रवालने तू गोलंदाजी करणार आहेस असं सांगितलं. वासुकी कौशिक हा कर्नाटकचा हुकूमी एक्का असलेल्या गोलंदाज जखमी असल्याने वेंकटेशच्या खांद्यावर गोलंदाजीची जबाबदारी आली. 22 वर्षीय वेंकटेशला जे काही घडत होतं त्यावर विश्वास बसत नव्हता, कारण त्याला पहिल्यांदाच संघातून खेळण्याची संधी मिळालेली. मात्र याच कारणामुळे तो फार नर्व्हसही होता. खेळ समजून घेण्यासाठी आणि तयारीसाठी कोणताही वेळ न मिळाल्याने वेंकटेश थोडा चिंतेत होता. मात्र त्याला संघाची गरज म्हणून गोलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागलं.


केवळ 36 धावा दिल्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राइट आर्म मीडियम पेसर असलेल्या वेंटकेशनं या मिळालेल्या संधीचं सोनं केलं. एम. वेंकटेशने 14 षटकं टाकली. यामध्ये त्याने केवळ 36 धावा देत फलंदाजी करणाऱ्या संघातील 5 गड्यांना तंबूत पाठवलं. उत्तराखंडच्या फलंदाजांना वेंटकेशची गोलंदाजी कळतच नव्हती. आपल्या 14 षटकांपैकी वेंकटेशने तीन मेडन म्हणजेच निर्धाव ओव्हर टाकल्या. रणजी ट्रॉफीमध्ये (ranji trophy) आपल्या पहिल्याच सामन्यात पाच गडी बाद करणारा वेंकटेश हा कर्नाटकचा 12 वा गोलंदाज ठरला आहे.


मला वेळही मिळाला नाही...


कर्नाटकचा संघ रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनलमध्ये उत्तराखंड विरोधात सामना खेळत आहे. पहिल्यांदाच रणजी सामन्यात खेळणाऱ्या उंच शरीरयष्टीच्या वेंकटेशने अनेक फलंदाजांना अगदी सहज तंबूत पाठवलं. "मी फार आनंदी आणि नर्व्हस होतो. माझ्याकडे माझ्या कुटुंबाला मी आजचा सामना खेळतोय हे सांगण्याचाही वेळ नव्हता," असं वेंकटेश सामन्यानंतर म्हणाला.


क्रिकेटसाठी संगीत सोडलं


सामन्याच्या 12 व्या षटकामध्ये आपल्या नावावर पहिली विकेट नोंदवल्यानंतर वेंटकेशला आपण चांगली कामगिरी करु शकतो असा विश्वास निर्माण झाला. त्यानंतर त्याने अशी काही गोलंदाजी केली की सामन्यानंतर त्याचीच चर्चा होती. वेंकटेश हा एक उत्तम गोलंदाज असण्याबरोबरच एक उत्तम संगीतकारही आहे. वेंकटेश कर्नाटकमधील संगीतकारांच्या आणि कलाकारांच्या घरात मोठा झालेला आहे. त्याची आजी सरोजा या एक प्रसिद्ध कर्नाटक संगीत गाणाऱ्या गायिका होत्या. त्याची आई दाक्षिणायिनी मुरलीधर एक उत्तम क्लासिकल डान्सर आहे.


वेंकटेशचा छोटा भाऊ योगेश्वर सुद्धा एक संगीतकार आहे. तो कन्नड टीव्ही वाहिन्यांवरील एक नावाजलेला चेहरा आहे. मात्र वेंकटेशचे वडील मुरलीधर यांनी वेंकटेशला क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रीत करम्याचा सल्ला दिला. वेंकटेशने क्रिकेटसाठी संगीत क्षेत्रातील प्रशिक्षण थांबवलं.