मुंबई :  महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाची शान, मान आणि अभिमान असलेल्या महाराष्ट्र श्री या प्रतिष्ठीत स्पर्धेला यंदा रॉयल स्टेटस लाभले आहे. येत्या 24 आणि 25 फेब्रूवारीला मुंबईस्थित वांद्रे येथे होणाऱया या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या भव्य आणि दिव्य आयोजनाचं शिवधनुष्य अभिनव फाऊंडेशनचे सर्वेसर्वा आणि माजी नगरसेवक क्रीडाप्रेमी महेश पारकर यांनी पेललं असून किताब विजेत्याला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह स्टेटस सिंबॉल असलेली रॉयल एनफिल्ड देऊन गौरविले जाणार आहे. त्यामुळे 14 व्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत पीळदार कामगिरी करण्यासाठी अवघं महाराष्ट्र घाम गाळतोय. त्याचबरोबर तिसरी फिजीक स्पोर्टस् अजिंक्यपद स्पर्धाही रंगणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे माजी नगरसेवक महेश पारकर प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने शरीरसौष्ठवपटूंचा स्टेटस वाढवणार आहेत.  दोन वर्षांपूर्वी या क्रीडाप्रेमी पारकरांनी मुंबई श्रीचे ग्लॅमरस आयोजन केले होते. आता एक पाऊल पुढे टाकत यंदा त्यांनी महाराष्ट्र श्रीच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच अनुषंगाने येत्या 25 फेब्रूवारीला होणाऱया मानाच्या स्पर्धेत विजेत्याला लाखमोलाचा पुरस्कार दिला जाईलच, पण त्याबरोबर काही अनपेक्षित सरप्राइज पुरस्कारही शरीरसौष्ठवपटूंना देण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती आयोजक पारकर यांनी दिली.


महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमी सर्वोच्च असलेल्या महाराष्ट्र श्री चा रूबाब आणि थरार यंदा काही औरच असेल. वांद्रे पूर्वेच्या शासकीय वसाहतीतील पीडब्ल्यूडी मैदानात रंगणारी ही स्पर्धा राज्य अजिंक्यपद असली तरी या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाणार आहे. अभिनव फाऊंडेशनचे प्रमुख महेश पारकर यांना महाराष्ट्र श्रीचे आयोजन नुसते दिमाखदार आणि संस्मरणीयच करायचे नव्हते तर खेळाडूंना श्रीमंत करणारेही असावे, हेच ध्येय समोर ठेवून त्यांनी स्पर्धा आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. त्यानूसार पुरस्कार रकमेत भरघोस वाढ करण्याचा प्रयत्नही ते करीत आहेत. विजेत्याला रोख पुरस्कार आणि अप्रतिम चषकासह बुलेट दिली जाईलच, पण ही स्पर्धा सदैव स्मरणात राहावी, असे भव्यदिव्य करण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे.  एकंदर दहा गटात होणाऱया या स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल पाच खेळाडूंवर 15,12,10,8 आणि 5 हजार असे एकूण 50 हजार रूपयांच्या रोख पुरस्कारांचा पाऊस पडेल. त्याचप्रमाणे स्पर्धेचा उपविजेता 50  हजारांचा तर द्वितीय उपविजेता 25 हजारांचा मानकरी ठरेल. त्याचबरोबर फिजीक स्पोर्टस् प्रकारात पुरूष व महिलांच्या गटातही मुख्य स्पर्धेप्रमाणेच गटातील अव्वल खेळाडूंना पुरस्कार दिले जातील.



महाराष्ट्र श्रीसाठी कॉंटे की टक्कर


यंदा महाराष्ट्र श्रीमध्ये काँटे की टक्कर होणार हे कुणीही सांगू शकतो. सर्वांचे लक्ष मुंबईकर सुनीत जाधवने वेधले असून तो सलग पाचव्यांदा हा बहुमान पटकावयाला सज्ज झाला आहे. 2014 पासून सुरू झालेली जेतेपदाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यासाठी सुनीत प्रचंड मेहनत करतोय. 2014 साली मुंबईत अंधेरीत झालेल्या या स्पर्धेत त्याने सर्वप्रथम बाजी मारली होती. त्यानंतर मुंबईच्या वडाळा येथे त्याने संग्राम चौगुलेवर मात करीत हा बहुमान आपल्याकडेच राखला होता. 2016 साली करवीरनगरीत त्याने महाराष्ट्र श्रीची हॅटट्रीक साजरी केली तर जेतेपदाचा चौकार गतवर्षी ठाण्यात मारला. आता त्याला फाइव्हस्टार कामगिरी करायचीय. त्याच्यासमोर कडवे आव्हान आहे ते मि.वर्ल्ड स्पर्धेत सोनेरी कामगिरी करणाऱया महेंद्र चव्हाणचे. महेंद्रनेही गेल्या काही महिन्यात जबरदस्त कामगिरी केल्यामुळे सुनीतला आपले जेतेपद राखणे आव्हानात्मक असेल यात वाद नाही. तसेच मुंबई श्री विजेता अतुल आंब्रे, भारत श्री अक्षय मोगरकर आणि सागर कातुर्डे यांनीही महाराष्ट्र श्री स्पर्धेत जेतेपदाचे ध्येय समोर ठेवल्यामुळे यंदा मुंबईकरांना काँटे की टक्कर पाहायला मिळणार, हे निश्चित आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी 24 फेब्रूवारीला वांद्रे  पूर्वेकडील  उत्तर भारतीय संघच्या सभागृहात पार पडेल.
 


आता महिला शरीरसौष्ठवपटूंसाठी मिस महाराष्ट्र


शरीरसौष्ठव खेळात आता राष्ट्रीय पातळीवर महिलांचे प्रमाण हळू वाढू लागले आहे. मुंबईतही या खेळाकडे करिअर म्हणून पाहणाऱया महिलांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशा  खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मिस महाराष्ट्रचेही आयोजन केले जात आहे. फिजीक स्पोर्टस् प्रकारात ही स्पर्धा होणार असून यात महिलांबरोबर पुरूषांच्याही गटाचा समावेश आहे. या गटातून आगामी मि.इंडियासाठी महाराष्ट्राचे संघ निवडले जाणार असल्यामुळे या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने खेळाडू तयारी करीत असल्याची माहिती महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे यांनी दिली. या दोन्ही गटात सहभागी खेळाडूंची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल, असा विश्वासही रोठे यांनी बोलून दाखविला. स्पर्धेत सहभागी खेळाडूंची आयोजकांमार्पत अप्रतिम व्यवस्था ठेवण्यात आली