Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती विभागातील उपांत्य सामना वाशिमचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांच्यात पार पडला. थरारक राहिलेल्या या सामन्यात महेंद्र गायकवाडने सिकंदरचा पराभव केला. पहिल्या फेरीत सिकंदर शेख 2-1 गुणांनी आघाडी घेतली. मात्र, महेंद्रच्या डांग डाव सिकंदरला रुचला नाही आणि दुसऱ्या फेरीत महेंद्रने 4 गुणांची बाजी मारली. सिकंदर डेन्जर पोझिशन (Danger Position) नसताना चार गुण कशाचे दिले गेले?, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित होताना दिसतोय. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.(maharashtra kesari 2023 tournament referee Maruti Satav threatened by constable Sangram Kamble of mumbai police force marathi new)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सिकंदरवर अन्याय झाला याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच सिकंदरविरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळेने (Sangram Kamble) फोन वरून दिली धमकी (Threat) दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंचाना धमकी मिळाल्याने कुस्तीच्या आघाड्याच एकच चर्चेला उधाण आलं आहे.


पंच मारूती सातव यांनी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2023) स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे केली तक्रार दाखल केली. यानंतर समितीने पुण्यातील कोथरूड पोलिस (Pune News) ठाण्यात संग्राम कांबळे यांच्या विरोधात तक्रार दिलीये. त्यामुळे आता मोठा वाद उभा राहिल्याचं पहायला मिळतंय. संग्राम कांबळे यांनी पंच मारुती सातव (Maruti Satav) यांना फोन करून लाज काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.


आणखी वाचा - Sikandar Sheikh : हाच तो क्षण ज्या डावामुळे सिकंदर हरला, पहिल्यांदाच समोर आला व्हिडीओ!


महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल संग्राम कांबळे नेमणूक मुंबई पोलीस  (Mumbai Police) यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पंच मारुती सातव आणि जुरी दिनेश गुंड यांना धमकावलं, असा आरोप आहे. त्यानंतर आता परिषद याबाबत काय निर्णय घेणार?, असा सवाल उपस्थित केला जातोय.


दरम्यान, नेहमीच धमकावणाऱ्या पोलिसावर महाराष्ट्र शासन कार्यवाही करणार का ? पंच यापुढं न्यायदानाचे काम कसं करणार? आयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohal) काय भूमिका घेणार ?, असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. त्यामुळे आता आखाड्यात कुस्ती (Wrestling) सोडून चर्चेचं सत्र भरलंय.