MS Dhoni Birthday Celebration: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आता 42 वर्षांचा झाला आहे. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं तो महेंद्रसिंह धोनी आता 43 व्या वर्षात प्रवेश करतोय. आयसीसीच्या तिन्ही फॉर्मटमध्ये टीम इंडियाला (Team India) घवघवीत यश मिळवून देण्यास धोनीचा मोठा हातभार राहिलाय. अशातच बर्थडेनिमित्त धोनीने खास व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने खास मित्रांसोबत त्याचा बर्थडे साजरा (MS Dhoni Birthday Celebration) केला आहे. हे खास मित्र दुसरे तिसरे कोणी नसून त्याचे पाळीव कुत्रे आहेत.  पाळीव कुत्र्यांसह धोनीने वाढदिवसाचा केक कापला. त्याचा व्हिडिओ धोनीने शेअर केला आहे. धोनीने स्वत: केक खाण्यापूर्वी आपल्या लाडक्या पाळीव कुत्र्यांना केक खाऊ घातला. माहीच्या या कृतीमुळे त्यांनी सर्वांची मनं जिंकली आहे. तुमच्या सर्व शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद, मी माझ्या वाढदिवशी जे केले त्याची एक झलक, असं कॅप्शन देखील धोनीने दिलं होतं.


पाहा Video


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)


पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत झारखंडच्या रांची येथील फार्महाऊसमध्ये माहीने वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्याच्या जवळचे लोकंच उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या घराबाहेर अनेक चाहत्यांनी उपस्थिती लावली होती. संध्याकाळी धोनीने सर्वांची भेट घेतली अन् त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या.


झारखंडमधील रांची येथे एका छोट्या गावात लहानाचा मोठा झाल्यामुळे धोनीची राहणी साधी होती. मैदानावर माही त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. म्हणूनच त्याला ‘कॅप्टन कूल’ ही उपाधी मिळाली. काही दिवसांपूर्वी, महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) काही वेळा आपला संयम गमावला आहे. जेव्हा मी गोलंदाजी करताना लाईन आणि लेंथमध्ये चूक केली, तेव्हा त्याने मला शिवीगाळ देखील केली आहे, असा खुलासा इशांत शर्मा केला होता. 'कूल तो नहीं हैं, बहुत गाली देते हैं, मुझे भी बहुत दी है', असं म्हणत इशांत शर्माने कॅप्टन कूल टॅग पुसला आहे.