MS Dhoni: चेपॉकच्या मैदानावर धोनीने आस्मान दाखवलं, 2 बॉलवर 2 सिक्स अन् पैसा वसूल; पाहा Video
MS Dhoni In Chepauk Stadium: चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील शेवटच्या दोन चेंडूंवर धोनीने दोन षटकार ठोकले आणि प्रेक्षकांचा पैसा वसूल केला आहे.
MS Dhoni, CSK vs PBKS: महेंद्रसिंह धोनीसाठी (Mahendra Singh Dhoni) चेपॉकचं मैदान खास राहिलंय. चेपॉकवर (chepauk stadium) धोनीने अनेक सामने खेळले आहेत. त्यामुळे चाहत्यांच्या प्रेम पाहून तो नेहमीच भारावून गेल्याचं दिसून येतं. चेपॉकवर संधी मिळाली, तर धोनी फलंदाजी करण्याची संधी सोडत नाही. काही दिवसांपूर्वी, धोनीने आपला अखेरचा टप्पा असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे मला खेळ एन्जॉय करायचाय, असंही धोनी अनेकदा म्हणतो. अशातच धोनीने चेपॉकवर एक भन्नाट निर्णय घेतला. (Mahendra Singh Dhoni hit 2 sixes in 2 last ball in CSK vs PBKS ipl 999 match Watch Video)
महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा चेपॉक मैदानावर आपल्या फलंदाजीनं चाहत्यांचं भरपूर मनोरंजन केलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनी मैदानात आला आणि त्यानं अवघ्या चार चेंडूत आपल्या स्फोटक फलंदाजीने सीएसकेला 200 वर पोहोचवलं. चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील शेवटच्या दोन चेंडूंवर धोनीने दोन षटकार ठोकले आणि प्रेक्षकांचा पैसा वसूल केला आहे.
आणखी वाचा - Rohit Sharma ला 'हिटमॅन' नाव कसं पडलं? बर्थडे निमित्त जाणून घ्या रंजक किस्सा!
20 व्या ओव्हर सॅम करनने (Sam Curran) केली. अखेरच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सॅम करनने रवींद्र जडेजाला घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर मैदानावर कोण येणार? धोनी की रहाणे? याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र, धोनीने प्रेक्षकांना निराश न करता बॅट घेऊन मैदानात उतरला. धोनीने अखेरच्या ओव्हरमध्ये 4 चेंडूत 13 धावा तडकावल्या आणि चाहत्यांना जल्लोष साजरा करण्याची संधी दिली.
सॅमच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 2 चेंडूत गगनाला भिडणारे 2 षटकार धोनीने ठोकले. माहीने पहिला सिक्स ऑफ साइडच्या दिशेने मारला, त्यानंतर मिडविकेटच्या दिशेने दुसरा सिक्स खेचला आणि खचाखच भरलेल्या मैदानात पिवळं वादळ आल्याची अनुभूती पहायला मिळाली.
पाहा Video -
दरम्यान, धोनीने आजच्या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू या दोघांनाही संधी दिली होती. त्यामुळे आज धोनी काय बॅटिंग करत नाही, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, रहाणे आणि रायडू यांना बाजूला करत धोनीने मैदान मारलं. चेन्नईच्या संघाकडून डिवॉन कॉन्वे याने 52 चेंडूत 92 धावांची वादळी खेळी केली.