नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या चेन्नई सुपरकिंग टीममधून खेळू शकतो. आयपीएलच्या संचालन परिषदेने धोनीचा चेन्नई सुपरकिंगमध्ये परतण्याचा रस्ता मोकळा केला आहे. प्रत्येक फ्रेंचायजी गेल्यावर्षीच्या टीममधील जास्तीत जास्त ५ खेळाडू पुन्हा खरेदी करु शकते असे आयपीएलच्या संचालन परिषदेने बुधवारी सांगितले.


टीम्सचे बजेट वाढले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्रसिंग धोनी गेल्यावर्षी आयपीएलमध्ये रायजिंग पुणे सुपरजाएंट्स टीमचा कॅप्टन होता. संचालन परिषदेने आयपीएल टीम्ससाठीचा बजेट ६६ कोटी रुपये वाढवून ८० कोटी केले.


चैन्नेई टीमला २ वर्षांसाठी निलंबित केले होते. आणि आता धोनी २ वर्षांनंतर पुन्हा चैन्नई टीमची जर्सी घालून दिसणार आहे. 


धोनीचा रस्ता मोकळा 


आयपीएलच्या संचालन परिषदेत महेंद्रसिंगधोनीचा चेन्नई सुपरकिंगमध्ये येण्याचा रस्ता मोकळा केला आहे.


स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपात बॅन केलेल्या सीएसके आणि राज्यस्थान रॉयल्स टीम्स २०१५ तील त्यांच्या खेळाडूंना पुन्हा घेऊ शकते.