IND vs PAK : `रात्री मी झोपू शकलो नाही`, श्रेयस अय्यरला कशाची काळजी? स्वत:च केला खुलासा!
Shreyas Iyer, India vs Pakistan : गेल्या 6 महिन्यापासून दुखापतीमुळे बाहेर असलेल्या अय्यरला पाकिस्तानविरुद्ध काही खास कामगिरी करता आली नाही. सामन्याआधी श्रेयसला चिंता लागून राहिली होती. अन् सामन्यात देखील नेमकं तेच घडलं.
Shreyas Iyer IND vs PAK Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना खऱ्या अर्थाने हाय व्होल्टेज सामना असतो. दोन्ही संघासाठी प्रेशर सामना कोण जिंकणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. या सामन्यात रोहित शर्माने श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संधी दिली होती. गेल्या 6 महिन्यापासून दुखापतीमुळे बाहेर असलेल्या अय्यरला पाकिस्तानविरुद्ध काही खास कामगिरी करता आली नाही. सामन्याआधी श्रेयसला चिंता लागून राहिली होती. अन् सामन्यात देखील नेमकं तेच घडलं.
नेमकं काय म्हणाला श्रेयस अय्यर?
दुखापतीमुळे मी आशिया कप खेळण्याचा विचार केला नव्हता. माझी रिकव्हरीची क्रिया मंदावली होती. निवड होण्याच्या सुमारे एक आठवडा आधी मी फिटनेस चाचणी उत्तीर्ण झालो. यामुळे मला खूप आनंद झाला होता. काल रात्री मी नर्व्हस होतो. मला झोपही येत नव्हती. पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यासाठी मी उत्सुक होतो. खरं सांगायचं तर ही एक छान भावना आहे. पाकिस्तान सध्या नंबर 1 संघ आहे, असं श्रेयस अय्यर म्हणाला आहे.
मला कोट राहुल द्रविड सर आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सध्या ड्रेसिंग रुममध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय. शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि नसीम शाह यांच्याविरुद्ध खेळणं आनंददायक आहे, असं श्रेयस अय्यर म्हणाला आहे.
दरम्यान, आशिया कपच्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाची टॉप ऑर्डर मोडून काढली. तर श्रेयस अय्यरला देखील चांगली कामगिरी करता आली नाही. श्रेयस अय्यर टी-ट्वेंटी प्रमाणे हाणामारी करण्यासाठी गेला अन् 14 धावा करत बाद झाला. 9 बॉलमध्ये अय्यरने खणखणीत 2 फोर खेचले. मात्र, हॅरिस रौफने अय्यरला जाळ्यात अडकवलं.