IND vs AUS: LIVE सामन्यात Pujara ची अतरंगी बॉलिंग, लोकांना शेन वॉर्न आठवला, तर Ashwin म्हणतोय...
Cheteshwar Pujara Bowling Video: अखेरच्या सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराकडे बॉलिंग (Cheteshwar Pujara Bowling) सोपवली. पुजाराचा गोलंदाजीचा एक फोटो शेअर करत आश्विनने खोचक कमेंट केलीये.
Ravi Ashwin On Cheteshwar Pujara: तगड्या ऑस्ट्रेलियाचा मालिकेत पराभव करत टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (WTC Final 2023) गाठली आहे. त्यामुळे आता कॅप्टन रोहित शर्मा अँड टीमचा आनंद गगनात मावेना झालाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील 4 था सामना सुरू असतानात टीम इंडियाने जल्लोष केला. त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीत चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) नवी ओळख निर्माण करून दिली आहे.
अहमदाबादमध्ये खेळलेल्या गेलेल्या चौथ्या कसोटी (Ind vs Aus 4th Test) सामन्यातील 5 व्या दिवशीची शेवटची षटकं रोमांचक राहिली. रोहित शर्माने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराकडे बॉलिंग (Cheteshwar Pujara Bowling) सोपवली. पुजाराने नीटनेटकी ओव्हर टाकली. पुजाराने एका ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिला. पुजाराच्या ओव्हरचं समालोचकांनी देखील कौतुक केलंय. माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी समालोचन करताना पुजाराचं कौतूक केलं. गोलंदाजीची शैली ऑस्ट्रेलियाच्या महान शेन वॉर्नसारखी (shane warne) असल्याचं गावस्कर यांनी म्हटलं आहे.
Ravi Ashwin ची भन्नाट प्रतिक्रिया
पुजाराची बॉलिंग एवढी भन्नाट होती की, चक्क भारताचा स्टार गोलंदाज आर आश्विनला देखील ट्विट करून प्रतिक्रिया द्यावी लागली. आश्विनने ट्विट करत पुजाराचं कौतूक केलं. गोलंदाजी करतानाचा एक फोटो शेअर करत त्याला खोचक कमेंट केली. मै क्या करू? जॉब छोड दू? असा मथळा आश्विनने (Ravichandran Ashwin) फोटो शेअर करताना दिला आहे.
आणखी वाचा - IND v AUS: DRS पाहून Virat चा वाढला पारा, स्टंप माईकमध्ये आवाज कैद; पाहा Video
पाहा ट्विट -
दरम्यान, अश्विनला सहकारी रवींद्र जडेजासह (Ravindra Jadeja) संयुक्तपणे प्लेयर ऑफ द सिरीज ट्रॉफी देण्यात आली. त्यावेळी आश्विनने जडेजाचं कौतूक केलं आहे. एकत्र खूप छान प्रवास झाला. दिल्ली कसोटीत त्यानं सुंदर गोलंदाजी केली असं मला वाटलं. म्हणूनच आम्ही येथं आहोत, असं अश्विन पोस्ट मॅट प्रेझेन्टेशनवेळी म्हणाला आहे.
पाहा Video -
भारताने गाठली World Test Championship ची Final
श्रीलंकेचा न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलीये. पात्रतेची कोणतीही संधी मिळण्यासाठी श्रीलंकेला किंवीविरुद्धचे दोन्ही सामने जिंकणं आवश्यक होते. मात्र, श्रीलंकेला ही किमया गाठता आली नाही. त्यामुळे आता टीम इंडिया World Test Championship ची Final खेळणार आहे.