WTC Points Table : नुकतंच अॅशेज सिरीजची ( Ashes Series 2023 ) समाप्ती झाली असून ही सिरीज ड्रॉ झाली आहे. इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) या दोघांनीही 2-2 सामने जिंकले असल्याने ही अॅशेज सिरीज ( Ashes Series 2023 ) बरोबरीमध्ये सुटली. दरम्यान या सिरीजनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान याचा फरक टीम इंडियावर ( Team India ) कसा पडला, हे पाहुयात.


पाकिस्तान अव्वल स्थानी कायम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅशेज सिरीजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) नव्या सायकलची सुरुवात झाली आहे. ही नवी सायकल पाकिस्तानच्या टीमसाठी यशस्वी ठरताना दिसतेय. यावेळी पाकिस्तानच्या टीमने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( WTC Points Table ) अव्वल स्थान गाठलं आहे. 2 सामने जिंकण्याच्या बळावर पाकिस्तानच्या खात्यात 24 पॉईंट्स आहेत. 


टीम इंडियाला बसला फटका?


पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर असून टीम इंडिया या पॉईंट्स ( WTC Points Table ) टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मुख्य म्हणजे टेस्ट सामन्यांमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजविरूद्ध एकच सिरीज खेळून पूर्ण झाली आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाने ( Team India ) 1-0 असा वेस्ट इंडिजचा पराभव केलाय. तर दुसरा सामना ड्रॉ झाल्याने टीम इंडियाच्या खात्यात आतापर्यंत केवळ 16 पॉईंट्स झाले असून 66.67 टक्क्यांनी दुसऱ्या स्थानावर आहे.  



अॅशेज सिरीजमुळे इंग्लंड टीमला फटका?


अॅशेज सिरीजमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) या दोन्ही टीम्सना स्लो ओव्हर रेटचा फटका बसला होता. यावेळी स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीकडून ( ICC ) इंग्लंडच्या टीमने तब्बल 19 पॉईंट्स कापण्यात आले. त्यामुळे याचा मोठा फटका इंग्लंडच्या टीमला बसला आहे. यावेळी पॉईंट्स ( WTC Points Table ) टेबलमध्ये इंग्लंडची टीम वेस्ट इंडीजच्याही खाली आहे. 


दरम्यान यावेळी ऑस्ट्रेलिया टीमचेही 10 पॉईंट्स कापण्यात आले. यामुळे ऑस्ट्रेलियाची टीम 30 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.