Mamata Banerjee ON Saurab Ganguly : भारताचा माजी खेळाडू आणि दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीला बीसीसीआय अध्यक्ष पदावरून काढण्यात आलं आहे. सौरवच्या जागी माजी खेळाडू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती होणार असल्याचं बोललं जात आहे. याचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटत असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दादाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. (Mamata Banerjee demanded Modi government for Sourav Ganguly latest marathi Sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरव गांगुली आणि अमित शहा यांच्या मुलाला तीन वर्षांची मुदत देण्यात आली होती. पण मला आश्चर्य वाटतं की अमित शहांच्या मुलाचा कार्यकाळ संपला नाही आणि सौरवचा कार्यकाळ संपला. मला अमित शहा यांच्या मुलाशी कोणतीही अडचण नाही पण सौरवला का काढलं? त्याच्यावर अन्याय झाला असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहनही केलं आहे.


देशातील आणि जगातील प्रत्येकजण त्याला ओळखतो. ते कसे नाकारले गेले हे पाहून मला धक्का बसला आहे. याला राजकीय आणि सूडबुद्धीने घेऊ नका. तो राजकारणी नाही आणि क्रिकेटसाठी निर्णय घ्या. सौरवला आयसीसी निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.


बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्यावर काय म्हणाला सौरव?
कोणीही आयुष्यभर प्रशासक म्हणून राहू शकत नाही. प्रत्येकाला कधी ना कधी निराशेचा सामना करावा लागतो. लक्षात ठेवा, कोणीही रातोरात नरेंद्र मोदी किंवा सचिन तेंडुलकर किंवा अंबानी बनत नाही, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीने दिली होती. एकंदरित आता यावरून पुढे काय होतं याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे.