World Cup 2023 India vs Afghanistan : दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात वर्ल्ड कपचा (World Cup) 9 वा सामना खेळवला जातोय. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजयी सुरुवात केली. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध जिंकून विजयी वाटचाल कायम राखण्याचा प्रयत्न टीम इंडिया करेल. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) काही खास कामगिरी करता आली नाही. आजच्या सामन्यात बुमराहने चांगली सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यातील विकेटनंतर बुमराहने खास सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तान क्रिकेट टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.  रहमानुल्लाह गुरुबाज आणि रहमानुल्लाह गुरुबाज ही जोडी सलामीला आली. जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानला पहिला झटका दिला. बुमराहने इब्राहीम झद्रान याला 22 धावांवर बाद केलं. विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती कॅच गेला अन् झद्रान बाद झाला. त्यानंतर बुमराहने खास सेलिब्रेशन केलं. बुमराहने मॅचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलर मार्कस रॅशफोर्ड (Marcus Rashford) याची कॉपी केली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.


पाहा Video



टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.