नवी दिल्ली : जगभरात प्रसिद्ध असलेली रशीयन टेनिसपटू मारिया शारापोवा सध्या जोरदार चर्चेत आली आहे. ही चर्चा तिच्या टेनिस कोर्टवरील खेळीमुळे नव्हे. तर, इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या हॉट फोटोंमुळे सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मारिया शारापोवा ही खेळाडू असली तरी, ती एखाद्या मॉडेलपेक्षा तसूभरही कमी नाही. ती जितकी साधी दिसते तितकीच ती सूंदरही दिसते. त्यामुळे मारियाने खेळासोबतच आपल्या सौंदर्यानेही अनेकांचा कलेजा खलास केला आहे.



(छायाचित्र सौजन्य: मारिया शारापोवा इन्स्टाग्राम)


सध्याही ती आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. जे सौदर्य तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवले आहे. मारियाने नुकतेच एक फोटोशूट केले. या फोटोशूटपैकी काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रचंड हॉट आणि तितकीच सेक्सीही दिसत आहे. एका समुद्रामध्ये गर्द काळ्या रंगामधली बिकनी घालून उभी असलेल्या मारियाला तिच्या चाहत्यांनी केव्हाच पसंत केले आहे. या फोटोत तिने डोक्यावर टोपीही घातली आहे.



(छायाचित्र सौजन्य: मारिया शारापोवा इन्स्टाग्राम)


शारापोवा ही नेहमीच आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते. तिच्या चाहत्यांनाही तिचे फोटो प्रचंड आवडतात. या आधीही तिने अशा पद्धतीने अनेक फोटो शेअर केले आहेत.


महत्त्वाचे असे की, शारापोवा ला टेनिस संघाने (डब्ल्युटीए) आवल्या जागतीक रॅंकींगमधून हटवले होते. डोपींगच्या आरोपात दोषी आढळल्यामुळे शारपोवावर ही कारवाई करण्यात आली. ड्रग्ज सेवनात दोषी आढळल्यामुळे तिच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, काही कालावधीनंतर यात घट करून  ती बंदी १५ महिन्यांवर आणण्यात आली.