ENG vs AUS 2nd Test: सध्या क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड क्रिकेट ( Lord's, London ) ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (England vs Australia) यांच्यातील दुसरी अॅशेस टेस्ट सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या जोरावर स्टीव स्मिथच्या (Steven Smith) धमाकेदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 416 धावा केल्या आहेत. त्याला आता इंग्लंडचा संघ जोरदार प्रत्युत्तर देताना दिसतोय. स्मिथने 184 बॉलमध्ये 110 धावा केल्या. तर ट्रेविस हेडने देखील 77 धावांची महत्त्वाची खेळी केली. मात्र, या सामन्यात चर्चेत आला तो ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne). तोही एका च्युइंगममुळे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) म्हणजे जागतिक क्रिकेटमधील सर्वात मनोरंजक पात्र. आपल्या मजेशीर कलाकारीमुळे त्याने फक्त खेळतानाच नाही तर अनेकदा मनोरंजन देखील केलंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात झोपा काढणाऱ्या लॅबुशेनचा नवा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. अॅशेसच्या दुसऱ्या सामन्यात लॅबुशेनने असं कृत्य केलंय की, सर्वांनी त्याच्यावर टीका केली आहे.


नेमकं काय झालं?


ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात मार्नस लाबुशेन क्रीझवर फलंदाजीसाठी उपस्थित होता. फलंदाजी करताना तोंडात च्युइंगम चघळत राहणं, अशी त्याची सवय... इंगिनदरम्यान, ड्रिंक्स ब्रेक झाला. यानंतर जेव्हा लाबुशेन पुन्हा फलंदाजीसाठी सज्ज होऊ लागला तेव्हा त्याच्या तोंडातून च्युइंगम (Marnus Labuschagne chewing gum) जमिनीवर पडलं. आता खाली पडलेलं च्युइंगम कोण खाईल का? बारकी लेकरं पण उचलत नाहीत. पण या पठ्ठ्यानं चक्क मैदानावर पडलेलं च्युइंगम उचललं आणि तोंडात टाकलं. त्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. कृत्य कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर लाबुशेनवर टीका होताना दिसते.


आणखी वाचा - वर्ल्ड कपमधून बाहेर पडला हा स्टार क्रिकेटर; पाहा कोणाला मिळाली संधी?


पाहा Video



दरम्यान, लाबुशेन म्हणजे अतरंगी खेळाडू...डब्युटीसी फायनल सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) ड्रेसिंग रूमच्या बाहेर खुर्चीवर पाय सोडून शांत झोपला होता. मात्र ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु होताच वॉर्नर बाद झाला. वॉर्नर (David Warner) बाद झाल्याचं पाहताच लाबुशेन खाडकन जागा झाला आणि बॅट उचलत मैदानाकडे धावू लागला.