Marsh Cup : विचार करा...क्रिकेटचा सामना सुरु आहे...समोरच्या टीमचे 9 विकेट्स गेले असून जिंकण्यासाठी 72 रन्सची गरज आहे...ही अशी परिस्थिती असताना तुम्ही म्हणाल की, 99 टक्के हा सामना टीम हरणार. मात्र जर 11 व्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूने हा सामना जिंकवून दिला, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर... ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या मार्श कपमध्ये असं प्रत्यक्षात घडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या डोमेस्टिक क्रिकेटची मार्श कप स्पर्धा सुरु आहे. या टूर्नामेंटमध्ये नुकतंच अनेक मोठे मोठे रेकॉर्ड्स पहायला मिळाले. 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात सर्वात जलद लिस्ट ए शतक लगावण्यात आलं. तर दुसऱ्या एका सामन्यात 400 पेक्षा अधिक स्कोर बनवण्यात आला. रविवारी या स्पर्धेत न्यू साऊथ वेल्स आणि क्विंसलँड ( Queensland vs NSW ) यांच्यात सामना रंगला होता. 


या सामन्यात क्विंसलँडच्या टीमने लक्ष्याचा पाठलाग करताना 9 विकेट्स गमावले होते. सामना हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी क्विंसलँडला जिंकण्यासाठी तब्बल 72 रन्सची आवश्यकता होती. मात्र क्रिझवर शेवटची जोडी उपस्थित असल्याने चाहत्यांच्या जिंकण्याच्या आशा मावळल्या होते. तरीही 11 व्या नंबरवर आलेल्या खेळाडूने उत्तम खेळ करत टीमला जिंकवून दिलं. 


क्विंसलँडकडून 11 व्या नंबरवर केन रिचर्डसन मैदानात उतरला होता. यावेळी त्याने 36 रन्सची उत्तम खेळी केली. गुरिंदर संधुने रिचर्डसनला साथ दिली. यावेळी त्यांनी शेवटच्या विकेटसाठी 73 रन्सची पार्टनरशिप केली. मार्श कपच्या इतिहासात 10 व्या विकेटसाठी ही सर्वात मोठी पार्टनरशिप ठरली आहे. 


न्यू साऊश वेल्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 217 रन्स केले. यावेळी टीमचा कर्णधार मोइजेस ऑनरीकेजने 82 रन्सची खेळी केली. त्यासोबत डॅनियल ह्यूजने 59 रन्सची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना क्विंसलँडच्या टीमने 9 विकेट्स गमावून 146 रन्सपर्यंत मजल मारली होती. 


मात्र त्यानंतर संधु - रिचर्डसन यांच्या जोडीने तुफानी खेळी करत सामना जिंकवून दिला. क्विंसलँडसाठी सेम हेडलेटने 58 रन्सची खेळी केली. तर संधुने 45 बॉल्समध्ये 6 फोर लगावत 46 रन्सची केलेत. त्याने उत्तुंग सिक्स लगावत टीमला विजय मिळवून दिला.