मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 चा दुसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जातो.  पाकिस्तान टीमला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत पाकिस्तानी टीमला 147 रन्समध्ये गारद केलं. यानंतर लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने मात्र प्रेक्षकांची निराशा केली.


अवघ्या 12 रन्सवर रोहित माघारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

147 रन्सचं लक्ष्य गाठण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित राहुलच्या जोडीने मैदानात उतरला. राहुल पहिल्याच बॉलवर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रोहित शर्माकडून कर्णधाराची खेळी अपेक्षित होती, मात्र सिक्सनंतर पुन्हा चेंडू बाऊंड्री पार मारण्याच्या नादात रोहित इफ्तिखारच्या हाती कॅच आऊट झाला. 18 बॉल्समध्ये 12 रन्स करून रोहित बाद झाला.


दरम्यान पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात फ्लॉप गेल्यानंतर रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. यावेळी युझर्सने त्याला, कितीमध्ये फिक्सिंग केलंय? अशी विचारणा केली आहे. इतकंच नाही तर एका युझरने 12 रन्सवर आऊट झाल्यावर, रोहित पाकिस्तानकडून फार चांगला खेळला, असंही म्हटलं आहे. 





भारताचा विजय


या सामन्यात अखेर टी-20 आशिया कपच्या या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. पाकिस्तानने भारताला 148 रन्सचं लक्ष्य दिलं होतं, जे भारताने शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकलं. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने शेवटी सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला