मुंबई : भारत आणि न्यूझीलंड मधली टी-२० सीरीज भारताने ५-० ने जिंकली. आता ३ सामन्यांची वनडे सीरीज आणि २ सामन्यांची टेस्ट सीरीज होणार आहे. सीरीजच्या शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने ६० रन केले होते. पण दुखापतीमुळे त्याला मैदान सोडून जावं लागलं. त्यानंतर फिल्डींगसाठी ही रोहित शर्मा येऊ शकला नव्हता. दुखापतीमुळे वनडे आणि टेस्ट सीरीजमधून रोहित शर्मा बाहेर झाला आहे. रोहितच्या जागी वनडेमध्ये सीरीजसाठी मयंक अग्रवाल तर टेस्ट सीरीजमध्ये शुभमन गिलला टीममध्ये संधी मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या टी-२० मध्ये रोहित शर्माने ४१ बॉलमध्ये ६० रन केले होते. पण रिटायर्ड हर्ट झाल्यामुळे तो पुढे खेळू शकला नाही. दुखापतीमुळे रोहित शर्माला यातून बाहेर येण्यासाठी काही दिवस आराम करावा लागणार आहे. रोहित शर्माच्या दुखापतीबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बुधवारी न्यूझीलंड आणि भारत यांच्यात वनडे सीरीज सुरु होणार आहे.


मयंक अग्रवाल वनडे टीममध्ये रोहितच्या जागी असेल. पण लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ ओपनिंगला येतील तर मयंक वनडाऊनला येईल. याआधी वेस्टइंडीजच्या विरुद्ध शिखर धवन दुखापती बाहेर झाल्यामुळे मयंकला संधी मिळाली होती.


टेस्ट टीममध्ये राहुल आणि पृथ्वी शॉ नंतर शुभमन गिल तिसऱ्या स्थानी येऊ शकतो. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशच्या विरुद्ध गिलने रोहित आणि राहुल सोबत त्याने बॅकअप म्हणून ओपनरची भूमिका निभावली होती. न्यूझीलंड-ए च्या विरोधात अनौपचारिक टेस्टमध्ये त्याने 83 आणि नॉटआउट 204 रनची खेळी केली. त्यामुळे त्याची जागा टीम इंडियामध्ये निश्चित मानली जात आहे. टेस्ट टीमची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.


निवड समितीने पर्यायी खेळाडूंचा विचार केला आहे. पण त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.