Mayank Agarwal Ranji Trophy : न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने द्विशतकी खेळी करत इतिहास रचला आहे. अशातच आणखी एका खेळाडूने द्विशतक करत निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारताकडून सलामीला आलेल्या आक्रमक खेळाडूने रणजीमध्ये केरळविरूद्धच्या सामन्यामध्ये द्विशतक केलं आहे. (Mayank Agarwal Double Century in Ranji Trophy vs Keral latest marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणजीमध्ये केरळविरूद्धच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना केरळचा डाव 342 धावांवर आटोपला. त्यानंतर कर्नाटकचा कर्णधार मयांक अग्रवालने 208 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 17 चौकार आणि 5 षटकार मारले. तिसऱ्या दिवसाचा खेळ चालू असून केरळची धावसंख्या 383/6 इतकी आहे. त्यांच्याकडे 41 धावांची आघाडी आहे.  (Mayank Agarwal Double Century in Ranji Trophy vs Keral latest marathi sport news)


मयांकने आपल्या खेळीने निवड समितीचं लक्ष वेधलं असून टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहेत. मयांकने 2 मार्च 2022 रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यामध्ये त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. अवघ्या 26 धावा करून तो परतला होता. 


2013 साली त्याने प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केलं होतं तर 2018 मध्ये त्याने भारताकडून पहिली कसोटी खेळली. मयांकने आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले असून 41.33 च्या सरासरीने 1488 धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. मयांकची 248 सर्वोच्च धावसंख्या आहे.



दरम्यान, मयांक अग्रवाल कर्नाटक संघाचं नेतृत्व करत आहे. मयांकच्या द्विशतकी खेळीने तो पुन्हा एकदा लयीत आल्याचं दिसून आलं आहे. याआधी पंजाब किंग्जचं नेतृत्त्व केलं होतं मात्र त्याला फारशी काही चमक दाखवता आली नव्हती. आयपीएल 2022 मध्ये 13 सामन्यात एकूण 196 धावा केल्या आहेत. आता पार पडलेल्या IPL 2023 च्या लिलावात त्याला सनराईजर्स हैदराबादने त्याला 8.25 कोटींची बोली लावली आहे.