Mayank Agarwal: क्रिकेटच्या विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा अनुभवी ओपनर मयांक अग्रवालच्या ( Mayank Agarwal ) खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मयांक अग्रवाल रणजी ट्रॉफीमध्ये नेतृत्व करताना दिसणार आहे. यावेळी आगामी रजणी ट्रॉफीच्या सत्रात पहिल्या 2 सामन्यांसाठी कर्नाटकाच्या टीमचं कर्णधारपद सोपवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी काळात कर्नाटकाच्या रणजी टीमसाठी निकिन जोसकडे उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. के.एल राहुलला टीममध्ये संधी देण्यात आली नाहीये. यामागे कारण म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये सिरीज रंगणार आहे. 


स्थानिक क्रिकेटमध्ये अग्रवालची उत्तम कामगिरी


अग्रवालने 2022-23 देशांतर्गत सिझनमध्ये नऊ सामन्यांमध्ये 990 रन्स केलेत. यामध्ये तीन शतकं आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. कर्नाटक टीम 5 ते 8 जानेवारी दरम्यान हुबळीमध्ये पंजाबविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. तर दुसरा सामना 12 ते 15 जानेवारी दरम्यान गुजरात विरुद्ध अहमदाबादमध्ये रंगणार आहे.


2022 मध्ये टीम इंडियाकडून खेळली होती शेवटचा सामना


मयंक अग्रवालने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध बंगळुरू टेस्ट सामना खेळला होता. तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. त्या सामन्यात मयंकने पहिल्या डावात 4 तर दुसऱ्या डावात 22 रन्स केले होते. मयांकने भारतासाठी 21 टेस्ट आणि 5 वनडे सामने खेळलेत.


टेस्ट क्रिकेट मयांकने 4 शतकांच्या मदतीने 1488 रन्स केले आहेत. वनडे सामन्यात तो 17.20 च्या सरासरीने केवळ 86 रन्स करू शकला. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 94 सामन्यांमध्ये 7120 रन्स केले आहेत.


रणजी ट्रॉफीच्या सिझनमध्ये कशी असणार कर्नाटकाची टीम?


मयांक अग्रवाल (कर्णधार), रविकुमार समर्थ, देवदत्त पड्डिकल, निकिन जोस, मनीष पांडे, शुभांग हेगडे, शरत श्रीनिवास, विशाख विजयकुमार, वासुकी कौशिक, विद्वत कावेरप्पा, के शशिकुमार, सुजय सतेरी, डी निश्चल, एम वेंकटेश, किशन एस बेडारे, एसी रोहित कुमार.