नवी दिल्ली : भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा जागतिक विजेता मेरी कोमने जपानच्या सुबासा कोमुराला 48 किलो वजनी लाइट फ्लायवेट गटात 5-0 ने पराभूत केले. संपूर्ण लढ्यात ती जपानी बॉक्सरवर भारी पडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा प्रकारे मेरी कोमने स्पर्धेत आपलं सहावे पदक निश्चित केले आहे. त्याआधी, उपांत्यपूर्व फेरीत तिने चीनच्या पिनला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत अंतिम चारमध्ये जागा मिळवली होती. 34 वर्षीय मेरीने या स्पर्धेत चार सुवर्ण आणि एक रजत पदक जिंकले आहे.


अंतिम फेरी गाठणारी मेरी कोम आता 5 व्या सुवर्ण पदकावर आपलं नाव गाठते का हे पाहावं लागेल. 2003, 2005, 2010 आणि 2012 मध्ये मेरीने सुवर्णपदक पटकावले आहे. 2008 मध्ये मात्र तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं.