मुंबई : मुंबई संघानं रणजीचं विजेतेपद पटकावल्यास आता प्रशिक्षकाला १२ लाखांचं बक्षीस दिलं जाणार असल्याचं मुंबई क्रिकेट संघटनेकडून जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यामुळे कदाचित एमसीएकडून अशाप्रकारे बक्षीस जाहीर करण्यात आलेलं असावं. दरम्यान एमसीएकडून विविध वयोगटांच्या प्रशिक्षकपदांसाठी अर्ज मागवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमसीएच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, वरिष्ठ पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाचा कालावधीत एक वर्षांचा असून त्यांना २४ लाख रुपये मानधन दिलं जाईल. याचप्रमाणे रणजीचं विजेतेपद पटकावल्यस १२ लाख आणि उपविजेतेपद मिळाल्यास सहा लाखांचा बोनस मिळेल. संघटनेच्या कारभारात पारदर्शकता यावी, यासाठी प्रथमच पदनियुक्तीची सूचना संकेतस्थळावरुन जाहीर करण्यात आली आहे.