मुंबई : हॉकीप्रेमींना पद्मश्री बलबीर सिंग हे नाव ठाऊक नाही असे होणार नाही. मात्र ९४ वर्षीय आणि तीन सुवर्णपदक विजेते बलबीर सिंह यांच्यासोबत एक दुदैवी घटना घडली आहे. 



नेमके काय झाले ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 बलबीर सिंह यांनी १९७१ साली भारतीय पुरूष हॉकी वर्ल्डकपमध्ये कांस्यपदक जिंकले. २०१२ साली लंडन ऑलंपिक दरम्यान रॉयल ऑपेरा हाऊसद्वारा सिंह यांचा सन्मान करण्यात आला.  
 
 बलबीर सिंह यांनी जिंकलेली ३६ मेडल्स, १२० फोटो आणि ऑलंपिकची २ ब्लेझर म्युझियममध्ये ठेवायला दिली होती. 
 २०१२ साली लंडन ऑलंपिकमध्ये सन्मानित होताना त्यांना जिंकलेली काही पदकं दाखवायची होती. तेव्हा त्यांनी पदकं मागितली असताना ती गहाळ झाल्याची माहिती देण्यात आली.  
 


 कोठे होती पदकं  ?  


 बलबीर सिंह यांनी १९८५ साली स्पोर्ट्स म्युझियममध्ये ठेवण्यासाठी  ३६ मेडल्स, १२० फोटो आणि ऑलंपिकची २ ब्लेझर दिले होते.  पदकं गहाळ झाल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी केंद्रिय खेळ मंत्रालयाकडे मागणी केली. मात्र अजूनही त्यांना काहीच मिळाले नाही.  


 
 खेळ मंत्रालयाकडून आश्वासन   


 २०१७ साली केंद्रिय  क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांची भेट घेतली होती. त्यांनी मेडल शोधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कोणतीही कारवाई अजूनही झालेली नाही.  
साई कडून पटियाला पोलिसांनी मेडल  गहाळ झाल्याची तक्रार घेतली आहे.  


का नाही केली तक्रार  ?  


बलबीर यांच्या म्हण्यणानुसार, ते देशासाठी खेळले आहेत. हा देशच त्यांचं आयुष्य आहे. हॉकी हे पहिलं प्रेम असले तरीही देशाहून मोठं काहीच नाही. जर त्यांनी एफआरआय केली असती तर देशा- विदेशामध्ये याची बातमी झाली असती. यामुळे अधिक नुकसान झाले असते.