मुंबई : India vs Australia, 3rd Test Day 4 Live Updates


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे सुरु असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचं वर्चस्व दिसून येत आहे. तिसऱ्या दिवस अखेर भारताची धावसंख्या ५ बाद ५४ अशी झाली होती. चौथ्या दिवशी भारती संघाला २९२ धावांची आघाडीही मिळाली. 


जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्या कामगिरीवर सर्वांचच लक्ष असून त्या दोघांनीही आतापर्यंत अपेक्षित कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे. 


*चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त, भारताचा विजय लांबणीवर 



*अर्ध्याहून अधिक संघ तंबूत परतला असतानाही, पॅट कमिन्सची अर्धशतकी खेळी 


*मोहम्मद शामीच्या चेंडूवर स्टार्क त्रिफळाचीत, ऑस्ट्रेलियाचे आठ गडी बाद 


*विजयासाठी ऑस्ट्रेलियाला २११ धावांची गरज


*टी पेन रवींद्र जडेजाच्या चेंडूवर झेलबाद 


*ऑस्ट्रेलियाचे ७ गडी बाद, भारताची विजयाच्या दिशेने कूच 


*६ गडी गमावत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १७५ वर पोहोचली 


*ऑस्ट्रेलियाला सहावा झटका, धावसंख्या ६ बाद, १५७ धावा 


*चहापानापर्यंत ऑस्ट्रेलिया ५ बाद १३८, विजयासाठी भारताला ५ गडी बाद करण्याची तर ऑस्ट्रेलियाला २६१ धावांची गरज 



*१३५ धावांवर ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद, १० धावा करत मिच मार्श रवींद्र जडेजाच्या चेंडूवर झेलबाद 


*४४ धावांनंतर मार्श तंबूत परत, ४ गडी बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ. 


*संयमी खेळीनंतर शॉन मार्श, बुमराहच्या चेंडूवर बाद 


*ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येने ओलांडला शतकी आकडा, ३ बाद १०९ धावा 


*शॉन मार्शकडून संयमी खेळाचं प्रदर्शन, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३ बाद ८७ धावा 


*मोहम्मद शामीच्या चेंडूवर ख्वाजा एलबीडब्ल्यू, ३३ धावा करत तंबूत परत 



*शॉन मार्शकडून सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन, चाहत्यांचा उत्साह शिगेला  


*उपहारानंतरचा खेळ सुरू, ऑस्ट्रेलिया- २ बाद ५४ धावा



*उपहारापर्यंत सामन्यावर भारताचं वर्चस्व, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ बाद, ४४ धावा