थांबेल तो DK कुठला..! वर्ल्ड कप जिंकताच लागली लॉटरी, थेट 'या' भूमिकेत दिसणार

Dinesh Karthik appointed as RCB batting coach : आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकवर मोठी जबाबदारी आली आहे.   

| Jul 01, 2024, 12:20 PM IST
1/6

कोहलीला गुड न्यूज

इतके टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर मोहोर उमटवली तर दुसरीकडे विराट कोहलीला गुड न्यूज मिळाली आहे. 

2/6

आयपीएल

आरसीबीचा माजी स्टार फलंदाज दिनेश कार्तिक याने 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती.

3/6

निवृत्ती अन् गुड न्यूज

दिनेश कार्तिक याने 1 जून रोजी अधिकृतपणे सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर होती. अशातच आता एका महिन्यातच कार्तिकला गुड न्यूज मिळालीये.

4/6

दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

5/6

फलंदाजी प्रशिक्षक आणि मेन्टॉर

आरसीबीमध्ये दिनेश कार्तिक अगदी नवीन अवतारात परतला. दिनेश कार्तिक फलंदाजी प्रशिक्षक आणि मेन्टॉर मार्गदर्शक असतील, असं आरसीबी पोस्ट करत सांगितलंय.

6/6

ट्रॉफी जिंकून देणार

दरम्यान, संघात खेळताना आरसीबीला ट्रॉफी जिंकून देऊ शकलो नाही. मात्र, फलंदाजी प्रशिक्षक म्हणून यावेळी आरसीबी जिंकवणार, असा निर्धार डीकेने व्यक्त केलाय.