सामना अफगाणिस्तान- न्यूझीलंडचा, चर्चा मात्र भारताची; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
मात्र सोशल मिडियावर मात्र मीम्सचा पाऊस पडतोय.
मुंबई : भारतीय संघाने स्कॉटलंडविरुद्धचा सामना जिंकला आणि वर्ल्डकपमधील आपलं अस्तित्व काही प्रमाणात जागं ठेवलंय आहे. तरीही सर्व फॅन्सची नजर ही अफगानिस्तान आणि न्यूझीलंडच्या सामन्यावर असणार आहे. कारण, जर अफगानिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला तरच टीम इंडिया सेमीफायनलचा पल्ला गाठू शकतो. एकंदरीत सर्व जर-तरचा खेळ सुरु असताना दुसरीकडे मात्र सोशल मिडियावर मात्र मीम्सचा पाऊस पडतोय.
भारताने स्कॉटलंडवर 8 विकेट्सने विजय मिळवल्यामुळे टीमचं रनरेट उत्तम आहे. सध्या भारताच्या खात्यात एकूण 4 गुण जमा असून तिसऱ्या स्थानावर आहे. तर 1.619 रनरेट मिळवून उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. तर या ग्रुपमध्ये पाकिस्तानच्या टीमने चार सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे.
भारतीय फॅन्स देखील सोशल मीडियावर अफगाणिस्तानला सपोर्ट करत आहे. यावरून विविध प्रकारचे मीम्स बनवले जात आहेत. कुणी भारत-अफगाणिस्तान मैत्रीची तुलना शोलेच्या जय आणि वीरूसोबत करतंय, तर कोणी अफगाणिस्तानच्या फॅन्समध्ये मोठ्या संख्येत वाढ झाल्याचं सांगतायत.
न्यूझीलंड टीमचं 1.277 इतका रनरेट आहे. त्यामुळे जर भारताला उपांत्य फेरीत धडक मारायची असेल तर अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंडचा पराभव गरजेचं आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तान टीम काही चमत्कार करते का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.